ऑनलाइन..सा.क्रांतिवीर....ताजी बातमी...१६ ऑगस्ट नंतर नांदगाव शहराचा पाणी पुरवठा खंडित करणार-डॉ.नरेश गिते

सव्वा कोटी थकबाकी नगरपालिका भरत नसल्याने घेतला निर्णय

नांदगाव---संतोष कांदे

सुमारे सव्वा कोटी रुपयांची थकबाकी असताना थातूर-मातूर उत्तरे देऊन वेळ मारून नेणाऱ्या नांदगाव नगरपालिकेचा ५६ खेडी योजनेतुन होणारा पाणी पुरवठा खंडित केला जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.नरेश गिते यांनी दिली आहे.
     काल (दि.७) रोजी नांदगावला धावती भेट दिलेल्या डॉ.गिते यांनी तहसीलदार शिवकुमार आवळकंठे,गटविकास अधिकारी जे.टी. सूर्यवंशी,नगरपालिका मुख्याधिकारी वसुधा कुरणावळ,बाल विकास प्रकल्पाधिकारी संदीप गवळी या मोजक्या अधिकाऱ्यासमवेत बैठक घेतली.यावेळी नगरपालिका मुख्याधिकारी कुरणावळ यांना चांगलेच धारेवर धरत थकबाकी वसूल करण्याबाबत खडसावले.
    मनमाड वरून नांदगावला येत असताना तालुक्यातील पिकांची पिकांची पाहणी करत त्या संदर्भात तहसीलदार आवळकंठे यांच्याशी ही चर्चा केली,व सद्यस्थितीत पिण्याच्या पाण्यासाठी असलेल्या स्रोताबाबत माहिती जाणून घेतली.व ही वस्तुस्थिती जिल्हाधिकारी बी.राधाकृष्णन यांना कळवली असल्याचे डॉ.गिते यांनी सा.क्रांतिवीर शी बोलताना सांगितले.
     तालुक्यातील अपूर्ण घरकुल संदर्भात माहिती घेण्यासाठी व नांदगाव नगरपालिकेकडे असलेली सव्वा कोटी रुपयांची थकबाकी वसुली बाबत हा दौरा होता,मात्र शासकीय कर्मचाऱ्यांचा संप असल्याकारणाने या बाबत आवश्यक माहिती उपलब्ध होऊ शकली नाही,मात्र मुख्याधिकारी कुरणावळ यांना थकबाकी भरण्यासाठी १६ ऑगस्ट ही अंतिम तारीख देण्यात आली असून,या नंतर पाणी पुरवठा खंडित केला जाणार आहे.तसेच या ५६ खेडी योजनेतुन गळती बंद व्हावी,यास्तव दुरुस्तीसाठी सुमारे ७ कोटी रुपये संबधित विभागाकडे सुपूर्द करण्यात आले असल्याची माहिती ही त्यांनी यावेळी दिली.
     

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ