सा.क्रांतिवीर..गतिरोधक सह मिनी बसस्टँड उभारण्याची शहर युवा सेनेची मागणी
एक महिन्यात कार्यवाही न झाल्यास शिवसेना स्टाईल ने आंदोलन छेडण्याचा इशारा
नांदगाव----संतोष कांदे
शहरातील शनिमंदीर पुलावर व मनमाड रस्त्यावरील गुरुकुल अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर मिनीबस स्टॅण्ड उभारण्याची ; तर वर्दळीच्या ठिकाणी गतिरोधक करण्याची मागणी शहर युवा सेनेने नांदगाव तहसीलदारांकडे केली आहे.
तहसीलदार श्रीमती भारती सागरे यांना निवेदनात पुढे असे म्हटले आहे की,तालुक्याच्या ग्रामीण भागातून शहरात शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.त्यांना बसची वाट पाहत उन्हात उभे रहावे लागते.त्यामुळे गुरुकुल महाविद्यालय समोर व शनिमंदीर पुलावर मिनीबस स्टॅण्ड उभारण्यात यावे.
सध्याच्या काळात धूम स्टाईल ने दुचाकी पळवल्या जातात,भविष्यात अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही,म्हणून गुरुकुल समोर तसेच न्यु.इंग्लिश स्कुल,भारतीय स्टेट बँक,शासकीय गोदाम या ठिकाणी गतिरोधक निर्माण करण्याची गरज असल्याचे नमूद करून एक महिन्याच्या आत या विधायक मागणीची दखल घेऊन कार्यवाही व्हावी,अन्यथा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन छेडण्याचा इशारा शेवटी देण्यात आला आहे.
या निवेदनाच्या प्रति नांदगाव पोलीस स्टेशन,सार्वजनिक बांधकाम विभाग,आगार व्यवस्थापक यांना देण्यात आल्या आहेत.निवेदनावर युवा सेना शहरप्रमुख मनीष बागोरे,रिपाई (अ) जिल्हा कार्याध्यक्ष देविदास मोरे,रिपाई शहर कार्याध्यक्ष गौतम जगताप,विद्यार्थी संसद शहराध्यक्ष सागर शिंदे,शहरप्रमुख सुनील जाधव,यांच्यासह प्रीतम पवार,राजेंद्र गुढेकर,सनी बागोरे,किरण वर्देकर,राहुल सरग, महेश पेवाल,हर्षल पाटील,कडू कोळेकर,रईस मन्सूरी, अंबादास आयनोर,जगदीश गरुड आदींची नावे व सह्या आहेत.
Comments
Post a Comment