सा.क्रांतिवीर...लोकसहभागातून उभारलेल्या नाल्यांमध्ये साठले पाणी.!
नांदगाव---संतोष कांदे
येवल्याचे प्रांताधिकारी भीमराज दराडे यांच्या संकल्पनेतून नांदगाव तालुक्यातील घाटमाथ्यावर लोकसहभागातून नाला खोलीकरणाचे काम मोठ्या प्रमाणात करण्यात आले.काल पडलेल्या पावसाने त्याचे दृश्य परीणाम समोर आल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
शेतकऱ्यांचा सहभाग व येवल्याचे प्रसिद्ध कापसे पैठणी निर्मितीचे उद्योजक श्री.कापसे यांनीही शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवून,विनामोबदला जेसीबी मशीन दिले.त्यामुळे नाला खोलीकरणचे काम यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले.आणि स्थानिक बोलठाण ग्रामपंचायतीने ही समरसून साथ दिली.त्यामुळे जलयुक्त शिवार कामाबद्दल चा विश्वास वाढीस लागला आहे.
Comments
Post a Comment