सा.क्रांतिवीर...राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीला जळगाव बुद्रुक येथे मोठा प्रतिसाद.!

नांदगाव----प्रतिनिधी

नांदगांव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून तालुक्यातील प्रत्येक गावात जावून गावातील जेष्ठ कार्यकर्त्यांची भेट घेऊन व त्यांच्याशी चर्चा करून पुढील काळात पक्ष बांधणी करण्याचा निर्धार नांदगांव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केला असून त्याचाच भाग म्हणून १८ ऑगस्ट रोजी जळगांव बुद्रुक येथे धनराज बुरकुल यांच्या निवास स्थानी मोठ्या उत्साहात पार पडली.
             या बैठकीत गावपातळीवर कार्यकारणी निवडण्या संदर्भात व इतर प्रश्नांबाबत चर्चा झाली. गाव तेथे राष्ट्रवादी काँग्रेस ची शाखा करण्याच्या दृष्टिकोनातून सदर दौरा संपूर्ण तालुक्यात होणार आहे. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष संतोष गुप्ता यांनी यावेळी दिली.
          सदर बैठकीस नांदगांव तालुका कार्याध्यक्ष रमेश पगार, नांदगांव शहर उपाध्यक्ष सतिष अहिरे, पदमाकर महानुभव, धनराज बुरकुल, मच्छिंद्र घुगे, प्रभाकर निकुंभ, नागराज सांगळे, अंबादास शिंदे, रमेश गिते, रामदास गिते, वामन मोरे, दिपक मोरे, आदी सह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ