सा.क्रांतिवीर...चौथीच्या विद्यार्थ्यांना इयत्ता पहिली चे शिक्षण.!
शिक्षक नसल्याने नांदगाव तालुक्यातील वडाळी खुर्द येथे उदभवली ही परिस्थिती.
नांदगाव---संतोष कांदे
इयत्ता पहिली किंवा दुसरी च्या विद्यार्थ्यांना एका वर्गात बसवून शिक्षण दिले तर त्यात फारसे वावगे नाही,मात्र चौथीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याला तिसऱ्यांदा पहिलीचे शिक्षण घ्यावे लागत असल्याचा दुर्दवी प्रसंग शिक्षण विभागाच्या अनास्थेमुळे नांदगाव तालुक्यातील वडाळी खुर्द येथील इंदिरानगर या वस्तीशाळेत घडत आहे.
या बाबत अधिक असे की,या आदिवासी बहुल परिसरात द्विशिक्षकी शाळा सुरळीत सुरू होती,मात्र येथील एका शिक्षकाची बदली झाली,मात्र नवीन शिक्षक शैक्षणिक वर्ष सुरू होऊन तीन महिन्यांच्या कालावधी उलटून गेला तरी मिळालेला नसल्याने पहिलीच्या विद्यार्थ्यांवर मुदतपूर्व चौथीचे शिक्षण तर चौथीच्या विद्यार्थ्यांवर तिसऱ्यांदा पहिलीचे शिक्षण घेण्याची वेळ एक शिक्षक न दिल्याने आली आहे.
सदर वस्तीशाळेत सज्ञान पालकांची मुले बोटावर मोजता इतकीच आहेत,तर अशिक्षित पालकांच्या मुलांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने या मुलांचे शिक्षण शाळेतल्या शिक्षणावरच अवलंबून आहे.सक्तीचा व मोफत शिक्षणाचा कायदा शासनाच्याच दुर्लक्षामुळे अशा पद्धतीने बारगळला जात असल्याचे विदारक चित्र आहे.
Comments
Post a Comment