सा.क्रांतिवीर...दुष्काळाच्या उंबरठ्यावर असलेल्या नांदगाव तालुक्याचा भार प्रभारी अधिकाऱ्यांवर..

न्यायडोंगरी गटाच्या जिल्हा परिषद सदस्या  कु.अश्विनी आहेर यांनी जिल्हा नियोजन बैठकीत मांडले पालकमंत्र्यांकडे गाऱ्हाणे

नांदगाव----संतोष कांदे

आज नाशिक येथे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन मंडळाची बैठक पार पडली.तीत जिल्हा परिषद सदस्या कु.अश्विनी आहेर यांनी तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती कथन करत ; तालुक्यातील महत्वाच्या पदांचा कार्यभार प्रभारी अधिकारी सांभाळत असल्याचा पुनरुच्चार केला.व न्याय देण्याची मागणी पालकमंत्री ना.गिरीश महाजन यांच्याकडे केली.यावर सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन ना.महाजन यांनी दिले.
       यावेळी व्यासपीठावर खासदार हरिश्चंद्र चव्हाण,जिल्हाधिकारी बी.राधाकृष्णन,जिल्हा परिषद अध्यक्ष सौ.शीतल सांगळे,महसूल आयुक्त राजाराम माने,मनपा आयुक्त तुकाराम मुंढे,जिल्हा परिषद मुख्याधिकारी डॉ.नरेश गिते,ग्रामीण पोलीस अधिक्षक संजय दराडे,उपस्थित होते.

          आज (दि.५) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती.जिल्हाभरातील खासदार,आमदार,नगरसेवक,जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सभापती अशा सर्वच लोकप्रतिनिधींची या बैठकीला उपस्थिती होती.

     यावेळी जिल्हा परिषद सदस्या कु.आहेर यांनी नांदगाव तालुक्यात पावसाअभावी शेती पिकांची झालेली परवड,गावो-गावी पाऊस न पडल्याने पिण्याच्या पाण्याचे निर्माण झालेले दुर्भिक्ष यावर प्रकाशझोत टाकत पालकमंत्री ना.गिरीश महाजन व उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.त्याचबरोबर तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी ही पदे सध्या रिक्त असल्याने प्रभारी अधिकाऱ्यांकडे कारभार देण्यात आला आहे.त्यामुळे शेतकरी व सामान्य जनतेला त्रास सहन करावा लागत असल्याचा प्रश्न पोटतिडकीने मांडला.त्यावर पालकमंत्री ना.महाजन यांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.

नाशिक-: पालकमंत्री ना.महाजन यांच्याकडे तालुक्याची सद्यस्थिती मांडताना अश्विनी आहेर.

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ