सा.क्रांतिवीर..नांदगाव पंचायत समितीच्या उपसभापतीपदी सौ.आशा आहेर.!
जिल्हाप्रमुख कांदे व जेष्ठ नेते कवडे यांची सर्वसमावेशक राजकीय व्यूहरचना.
नांदगाव----संतोष कांदे
नांदगाव पंचायत समितीच्या उपसभापतीपदी सौ.आशा आहेर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
काही दिवसांपूर्वीच सभापतीपदी न्यायडोंगरी गटातील सावरगाव गणाच्या सौ.विद्या पाटील यांची निवड करण्यात आली होती.तर दुसऱ्या क्रमांकाचे उपसभापती पद ही न्यायडोंगरी गटातीलच न्यायडोंगरी गणाच्या पंचायत समिती सदस्या सौ.आशा किशोर आहेर यांना देण्यात आले आहे.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा तालुका सेनेचे सर्वेसर्वां सुहास कांदे,जेष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांनी भौगोलिक,सामाजिक राजकीय दूरदृष्टी समोर ठेवत ही निवड केल्याचे दिसून येते.या निवड प्रसंगी जिल्हाप्रमुख सुहास कांदे,बापूसाहेब कवडे,माजी सभापती विलास आहेर,नांदगाव कृृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तेज कवडे,सौ.विद्या पाटील, माजी सभापती सौ.सुमन निकम,नगराध्यक्ष राजेेेश कवडे,माजी उपसभापती सुभाष कुुटे,तालुका प्रमुख किरण देेेवरेे,सागर हिरेे,सूनिल जाधव,राजाभाऊ जगताप,आदी सह शेकडो शिवसैनिक उपस्थित होतेे.
Comments
Post a Comment