सा.क्रांतिवीर...जिल्हा परिषद सदस्या अश्विनी आहेर यांच्या प्रयत्नांना यश.!

नांदगाव तालुक्याला मिळाले पूर्णवेळ तहसीलदार

नांदगाव---संतोष कांदे

गेल्या सात ते आठ महिन्यापासून तालुक्यातील प्रमुख पद असलेले तहसीलदार पद प्रभारीच्या खांद्यावर असल्याने जनतेला अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता,त्यामुळे न्यायडोंगरी गटाच्या जिल्हा परिषद सदस्या अश्विनी आहेर यांनी  पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पूर्णवेळ तहसीलदार देण्याची जोरदार मागणी केली.त्यावर तातडीने कार्यवाही करत तालुक्याला पूर्णवेळ तहसीलदार देण्यात आले आहेत.
         पारनेर तालुक्यातून बदलून आलेल्या श्रीमती सागरे यांच्याकडे नांदगाव तहसीलदार पदाचा पदभार सोपवण्यात आल्याचा आदेश दि.२३ रोजी उशिरा काढण्यात आला.जिल्हा परिषद सदस्य अश्विनी आहेर यांच्या प्रयत्नांना यश आल्याने जनतेने समाधान व्यक्त केले आहे.

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ