सा.क्रांतिवीर....नस्तनपूर येथे शनी चरणी भाविकांची मांदियाळी.!

संस्थान कडून दर्शनासाठी सुयोग्य व्यवस्थापन

नांदगाव--संतोष कांदे

  आज आषाढ (शनी) अमावस्यानिमित्त नस्तनपुर नगरीत श्री.शनी भक्तांचा महापूर उसळला आहे.मात्र शनी संस्थानने भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन सुरळीत दर्शनासाठी चोख नियोजन केल्याने भक्तांनी समाधान व्यक्त केले आहे.
          प्रभु रामचंद्र स्थापित श्री शनि महाराज मंदिर नस्तनपुर या मंदिराचे पुराणातले वेगळेपण अधोरेखित झाले आहे देशाच्या शनि महाराजांच्या साडेतीन पीठापैकी एक पुर्णपीठ व आध्यपीठ म्हणुन या मंदिराची ओळख आहे .त्यामुळे शनी अमावस्या व जयंतीनिमित्त येथे लाखोंच्या संख्येने भाविक नतमस्तक होतात.
आजच्या यात्रा उत्सवनिमित्ताने संस्थानचे जनरल सेक्रेटरी माजी आमदार अड.अनिल आहेर यांनी स्वतः लक्ष घालून किल्ला वाहनतळ व मुख्य प्रवेशद्वार वाहनतळ अशा दोन प्रकारचे अद्ययावत वाहनतळाची निर्मिती, बैरेकेटिंग द्वारे भक्तानां दर्शनाची सुविधा, मुखदर्शनाची व्यवस्था,व्ही.आय.पी.दर्शनाची सुविधा,वाहनतळावर व यात्रेच्या स्थळावर ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, विविध ठिकाणी यात्रा परिसरा मध्ये वैद्यकीय उपचाराची सुविधा,यात्रेच्या वेळी याठिकाणी पैसेंजर (रेल्वे)  गाडी थांबते त्याठिकाणी टिकीट बुकिंग व्यवस्था,नांदगांव रेल्वे गेट पासुन ते शनि मंदिर नस्तनपुर पर्यन्त बसची व्यवस्था,यात्रेची गर्दी नियंत्रणात राहावी याकरिता सुरक्षा रक्षकांची नेमणुक तसेच कायदा व सुव्यवस्थेसाठी पोलीस यंत्रणा,खाद्यपदार्थ,प्रसाद, व इतर दुकानांचे स्वतंत्रपणे विगतवारी,शनि अमावस्या यात्रा उत्सवाच्या निमित्ताने येणाऱ्या दिंडीचे स्वतंत्र व्यवस्थापन,अभिषेक व सत्यनारायण पुजा करण्यासाठी स्वतंत्र कक्ष,देवाला अर्पण करावयाचे तेल,नारळ,फुल, पाण,हार यासाठी स्वतंत्र व्यवस्था असे नियोजन आहे.
      या शनि यात्रा उत्सवाच्या निमित्त खास आमंत्रित पाहुण्याच्या हस्ते महाआरतीचे दु.१२ वा होणार असुन त्याचे थेट प्रक्षेपण फेसबुक लाईव्ह द्वारे करण्यात येणार आहे, महाआरती नंतर साबुदाना खिचडीचे प्रसाद रूपाने मोठया प्रमाणात वाटप, नवस फेडण्याच्या कार्यक्रमासाठी संस्थानच्या आवारात स्वतंत्र व्यवस्था, अपंग भक्तांसाठी व्हील चेयरची व्यवस्था, यात्रा उत्सवाच्या काळात बाहेरगावा वरुन येणाऱ्या भाविकांसाठी मुक्कामी राहण्यासाठी स्वतंत्र कक्ष, यात्रा उत्सवात येणाऱ्या अडीअडचणी सोडविन्यासाठी तक्रार निवारण कक्ष, यात्रेची गर्दी लक्षात घेता भक्तांना दोंन्ही वाहनतळा पासुन पायी जावे लागणार आहे कुठलेही वाहन नेण्यास मज्जाव करण्यात आले आहे.
            देणगी देणाऱ्या भाविकांसाठी कर सवलत (80G) ची व्यवस्था,भक्तांना ऑनलाइन देणगीची व्यवस्था,रस्त्याच्या दुतर्फा व मंदिर परिसरात अस्तित्वात असलेल्या फुले,बगीचा,वृक्ष व त्याच प्रमाणे भाविकांनी स्वच्छ्ता व मंदिराची पावित्रता राखावी,यात्रा उत्सवानिमित्त मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. अधिक माहितिसाठी भाविकांनी संस्थानच्या कार्यालयाशी व संस्थानच्या अधिकृत श्री शनि महाराज मंदिर संस्थान नस्तनपुर या फेसबुक पेजला किंवा संकेतस्थळ www.shanimandirsansthannastanpur.com यावर संपर्क करून माहिती घ्यावी,असे आवाहन ही सेक्रेटरी अड.आहेर व विश्वस्त मंडळाने केले आहे.

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ