सा.क्रांतिवीर....महिला सरपंचाने केला सोशल जनमताचा आदर.!
नांदगाव तालुक्यातील मुळडोंगरीच्या सरपंच सौ.मंगला नावंदर यांची लोकांना गर्व वाटेल अशी कृती
नांदगाव---संतोष कांदे
बॉम्बस्फोट झाला,बोलवा आर्मी....पूर आला बोलवा आर्मी....मोर्चा,रास्ता रोको बोलवा आर्मी...दंगल झाली बोलवा आर्मी...मग ध्वजारोहन साठी नेत्यांना कशाला बोलावता.? तेव्हाही आर्मी च बोलवा ना.? अशा उपरोधिक पोस्ट सोशल मिडियातून सतत व्हायरल होत असतात.आणि या पोस्टला अनुसरून नांदगाव तालुक्यातील मूळडोंगरीच्या महिला सरपंच सौ.मंगला नावंदर यांनी सोशल मताचा आदर राखत सुट्टीवर आलेल्या लष्करी जवान आबासाहेब मोरे यांच्या हस्ते ध्वजारोहन केल्याने तो तालुकाभरात चर्चेचा विषय ठरला आहे.
ग्रामीण भागातल्या बेरकी राजकारणात ध्वजारोहनाला अनन्नसाधारण महत्व आहे.त्यासाठी पत्नी,बहीण, भाऊ अशा अनेक सोयीच्या नात्यांचा आधार घेत गावाच्या सत्तेची दोरी आपल्याच हाती ठेवण्याचा प्रयत्न सातत्याने होत असतो.मात्र याला मुळडोंगरी च्या सरपंच सौ.मंगला प्रकाशचंद्र नावंदर ह्या अपवाद ठरल्या आहेत.
आजच्या काळात सोशल मिडिया प्रभावी ठरत असल्याच्या घटना घडल्या आहेत,मात्र ध्वजारोहन या घटनेने दिलेला अधिकार असल्याने सौ.नावंदर यांच्यावर कुठलाही दबाव नव्हता,मात्र सोशल मिडियातल्या ह्या पोस्ट,आणि लष्करी जवानांविषयी च्या आंतरिक प्रेमापोटी त्यांनी हा निर्णय घेत ग्रामपंचायतीचे ध्वजारोहन लष्करी जवान श्री.मोरे यांचे हस्ते करत खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य दिन साजरा केला...
Comments
Post a Comment