सा.क्रांतिवीर...श्री.क्षेत्र नस्तनपूरला भाविकांनीच पाळावी स्वयंशिस्त.!

संस्थानला भाविकांकडून सहकार्याची अपेक्षा

नांदगाव----संतोष कांदे

   नांदगाव तालुक्यातील श्री.शनी देवाचे आद्यपीठ असलेल्या नस्तनपूर येथे भाविकांची पवित्र अशा श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर अलोट गर्दीचा महापूर उसळतो आहे,मात्र संस्थान कडे असलेल्या कमी मनुष्य बळामुळे शनिभक्तांनी ही स्वयंशिस्त बाळगावी.असे आवाहन जनरल सेक्रेटरी तथा माजी आमदार अड.अनिल आहेर व विश्वस्त मंडळाने केले आहे.
      जिल्ह्याचे तत्कालीन मंत्री तथा येवल्याचे आमदार छगन भुजबळ यांनी अड.आहेर यांच्या मागणीची दखल घेत या ठिकाणी कोट्यवधी रुपयांची दर्जेदार विकासकामे साकारली.त्यामुळे या लोकाश्रय व राज्याश्रय पासून कोसो दूर असलेल्या या क्षेत्राची लोकप्रियता कैक पटीने वाढली.
     संस्थानचे जनरल सेक्रेटरी तथा माजी आमदार अड.अनिल आहेर,विश्वस्त विजय चोपडा,उदय पवार,खासेराव सुर्वे,महावीर पारख,समाधान पाटील,उदय पाटील,डॉ.प्रभाकर पवार यांनी या वाढलेल्या गर्दीची दखल घेत या ठिकाणी पूर्णवेळ देत या क्षेत्राला एक वेगळीच झळाळी मिळवून दिली आहे.
     पाच वर्षे वयाची वृक्ष लागवड असो,वा या ठिकाणी पोलीस चौकीची निर्मिती किंवा मोफत धार्मिक,संस्कार केंद्र अशा अनेक उपक्रमांनी हे क्षेत्र भाविकांना आकर्षित करण्यास उद्युक्त करत आहे.

शनिवार (दि.२५) रोजी श्रावण शनिवार निमित्त साडेतीन शनी पीठांपैकी एक संपूर्ण असे आद्यपीठ व प्रभू रामचंद्र स्थापित श्री शनी महाराज मंदिर संस्थान नस्तनपुर येथे दुपारी १२.०० वा.नैवेद्य व महाआरती
मा.श्री.अनिलजी भवारी साहेब,(पोलीस निरीक्षक.नांदगाव)
मा.श्री.अजयजी वाघ साहेब
(गर्व्हमेंट कॉट्रेक्टर धुळे)
मा.श्री.नारायणराव पाटील गुरुजी
(रा.परधाडी ता.नांदगाव)
मा.श्री.प्रवीण घोटेकर (रा,चांदोरा ता.नांदगाव) यांच्या शुभहस्ते करण्यात आली.
     आरती नंतर संस्थान तर्फे भाविकांना साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले तसेच संस्थानने भाविकांच्या सोईसाठी स्वतंत्र अभिषेक व सत्यनारायण कक्ष उभारले होते आणि नवसपूर्तीचे कार्यक्रम(दाळ बट्टी) करण्यासाठी अतिरिक्त प्रसादालय शेड उभारण्यात आले होते.
   यावेळी जनरल सेक्रेटरी तथा माजी आमदार ॲड.अनिलदादा आहेर,अध्यक्ष नारायण अग्रवाल,विश्वस्त विजय चोपडा,खासेराव सुर्वे,उदय पवार समाधान पाटील,डॉ.प्रवीण निकम,उदय पाटील उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ