सा.क्रांतिवीर..नांदगाव तालुक्यातील पिंपरखेड येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात
कै. पुंडलिक पांडुरंग मवाळ माध्यमिक विद्यालय
नांदगाव---संतोष कांदे
येथील विद्यालयात ७२ वा. स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अभिजित पाटील मवाळ हे होते. प्रभात फेरी नंतर प्रमुख पाहुणे डॉ. अभिजित पाटील यांचे हस्ते विद्यालयाचे ध्वजारोहण करण्यात आले. सलामीनंतर राष्ट्रगीत झाले.
प्रसंगी विद्यालयात एस. एस. सी.मार्च २०१८ परीक्षेत प्रथम आलेली विद्यार्थीनी कु. हर्षली निकम हिला पाहून्यांच्या हस्ते रोख रक्कम गुलाबपुष्प देउन सन्मानित करण्यात आले. सोबतच विविध विषयात विद्यालयात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोख रकमेसह सन्मानित करण्यात आले. हे बक्षीस गावातील ग्रामस्थांनी व शिक्षकांनी प्रायोजित केले आहेत.
त्याचप्रमाणे डॉ. अभिजित पाटील मवाळ यांनी आपले वडील प्रा.कै.उत्तमराव गोविंदराव मवाळ यांच्या स्मरणार्थ ई. ८वी ते १०वी च्या विद्यार्थ्यांना रु.१०००० किमतीच्या वह्या भेट दिल्या. तसेच मा. बाळासाहेब पानसरे यांनी त्यांचा मुलगा कै. योगेश पानसरे यांच्या स्मरणार्थ ५वी ते १०वी च्या विद्यार्थ्यांना विविध शालेय साहित्य भेट दिले.
कार्यक्रमास संस्थेचे सरचिटणीस मा. वसंतराव बापू मवाळ, संचालक मा. शिवराम आबा कांदळकर, अशोकराव सानप, संभाजी दादा मवाळ, भिमा दादा गोराणे, दिलीप तात्या मवाळ, पोपटराव गायकवाड, सुकदेव घाडगे, राजू नाना चाकणकर, पोपट चव्हाण, मधुकर घोटेकर, रमेश गरुड निलेश चाकणकर, हनुमंत जाधव, गणेश मोरे, बबण जाधव आदी. मान्यवर, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर व आजीमाजी विद्यार्थी, पालक व गावातील प्रतिष्ठित नागरिक, आबालवृद्ध उपस्थित होते.
Comments
Post a Comment