सा.क्रांतिवीर...नांदगावच्या मराठ्यांनी घडवले सामाजिक एकतेचे दर्शन

शांततेत पार पडला रास्ता रोको..
नांदगाव----संतोष कांदे

जय शिवाजी...जय भवानी...चा गजर करत मराठा समाज बांधवांनी शांततेसह अवघ्या महाराष्ट्राला सामाजिक एकतेचे दर्शन ही आपल्या कृतीतून घडवले.
    आज नऊ ऑगस्ट महाराष्ट्र बंद ची हाक राज्य पातळीवरून दिली गेली होती,मात्र आज तालुक्याचा आठवडे बाजार आणि या बाजारात भाजीपाला किंवा अन्य शेतमाल विक्रीसाठी आणणारे शेतकरी ही आपलेच बांधव या उदात्त भावनेने केवळ रास्ता रोको करत मराठा समाज बांधवांनी आपली मागणी शासनाचे प्रतिनिधी तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांना सादर केली.
     या रास्ता रोकोत सकाळपासूनच माजी आमदार अड.अनिल आहेर,संजय पवार,विलास आहेर,बाळासाहेब कवडे,समाधान पाटील,राजेंद्र देशमुख,चंद्रशेखर कवडे,रमेश बोरसे,शिवाजी कवडे,तेज कवडे,राजाभाऊ जगताप,विठ्ठल आहेर,सुभाष कुटे,किरण देवरे,दर्शन आहेर,विठोबा मवाळ,अनंत आहेर,ज्ञानदेव आहेर,प्रभाकर पवार,बापूसाहेब जाधव,विशाल वडघुले, आदींसह शेकडो मराठा बांधव सहभागी झाले होते.
    
     

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ