सा.क्रांतिवीर..अखेर महानगरी एक्स्प्रेस ला नांदगावी थांबा
खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश
नांदगाव---संतोष कांदे
भारतात जेव्हा पासून रेल्वे सेवा सुरू झाली,तेव्हापासून नांदगाव रेल्वे स्टेशन इंग्रजांचे मुख्य केंद्र होते.मात्र नंतरच्या काळात रेल्वे सेवेबाबत नांदगावकरांची हेळसांडच झाल्याचे दिसून आले आहे.प्रत्येक रेल्वे थांबवण्यासाठी दरवेळेस संघर्षच करावा लागला आहे.आज मात्र दिंडोरी लोकसभा मतदार संघाचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून रेल्वे प्रवासी संघटना,ट्रेन लाईव्ह संघटना यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे महानगरी एक्स्प्रेस नांदगाव रेल्वे स्टेशनवर थांबण्यास सुरुवात झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
रेल्वे प्रशासनाकडे सल्लागार समिती नांदगांव/नांदगांव ट्रेन लाईव्ह संघटना/रेल्वे कृती समितीच्या सदस्यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.नांदगांव रेल्वे स्थानकावर महानगरी एक्स्प्रेस अप-११०९४ व डाऊन ११०९३ ला दि. ६ सप्टेंबर पासुन अधिकृत थांबा मिळाला आहे.
खा. हरिश्चद्र चव्हाण यांचे अभिनंदन तसेच महानगरी एक्स्प्रेस चे स्वागत करण्यासाठी नांदगावकरांनी दि.६ सप्टेंबर रोजी नांदगाव रेल्वे स्थानकावर मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन रेल्वे प्रवासी संघटना व रेल्वे कृती समितीने केले आहे.
Comments
Post a Comment