सा.क्रांतिवीर..

कर्मवीरांनी जात,पात, धर्म न बघता कार्य केल्याने संस्था यशोशिखरावर-शिवव्याख्याते जावेद शेख

नांदगाव----संतोष कांदे

    कर्मवीरांनी समाजाच्या उन्नतीसाठी आपले संपुर्ण आयुष्य वेचले,व बहुजनांच्या मुलांना शिक्षणासाठीची दारे उघडली  म्हणूनच आज बहुजन समाजातील मुलांना चांगले शिक्षण मिळत आहे.कर्मवीरांनी जात,धर्म,कोण,कुठला या गोष्टींकडे लक्ष न देता जनसामान्यांच्या विकासासाठी आपले आयुष्य या थोरपुरूषांनी खर्ची घातले,अशा कर्मवीरांचे गुण आत्मसात करून आपल्याला संस्थेचा विकास करणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन शिवव्याख्याते जावेद शेख यांनी केले.
            ते येथील मविप्र संस्थेच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आयोजित मविप्रचे आद्य संस्थापक कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्या जयंती निमित्त आयोजित समाजदिन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. त्यांनी आपल्या ओघावत्या शैलीतुन व कर्मवीरांच्या विविध पैलुंची माहीती यावेळी दिली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मविप्रचे नांदगाव तालुका संचालक दिलीप पाटील होते.  माजी आमदार संजय पवार, नांदगाव तालुका पंचायत समिती सभापती विद्याताई पाटील,जिल्हा परिषद सदस्य रमेश उग्रसेन बोरसे,प्राचार्य डॉ.एस.आय.पटेल,नगराध्यक्ष राजेश कवडे,  कनिष्ठ महाविद्यालय स्थानिक व्यवस्थापन समिती अध्यक्ष सर्जेराव पाटील,प्रतापराव पगार आदि व्यासपीठावर उपस्थित होते.
              यावेळी महाविद्यालयातील परिसरात कर्मवीरांच्या स्मरणार्थ मान्यवरांच्या हस्ते  महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी, क्रिकेटपटु अजित वाडेकर,तामिळनेते एम करूणानिधी,माजी लोकसभा सभापती सोमनाथ चटर्जी यांना कार्यक्रमाच्या सुरवातीलाच श्रध्दांजली अर्पण करण्यात आली  स्वागतपर मवोगतात प्राचार्य डॉ.एस.आय.पटेल यांनी नांदगाव मविप्र संकुलाच्या विकासाचा आढावा सादर केला यावेळी माजी आ.संजय पवार,जि.प.सदस्य रमेश बोरसे, वाल्मिक शेवाळे,अशोक जाधव यांनी मनोगत व्यक्त केले संस्थेने मनमाड येथे तेरा एकर जागेत सी.बी.एस.सी पँटर्नच्या शाळा सुरू करणार असुन तालुक्यातील सर्वच शाळा भौतिकदृष्टीने अद्यावत करण्याचा मानस आहे या कामी संस्थेच्या सर्वच पदाधिकारी,सदस्य,कर्मचारी व पालकांचे संस्थेच्या विकासासाठी सहकार्य मिळत आहे त्यामुळेच तालुक्यातील शाखांचा विकास करू शकलो तसेच व्यवासायीक शिक्षणासाठी प्रयत्न केला जात आहे नांदगाव महाविद्यालयात सात नवीन व्यवासायीक कोर्स सुरू करत असल्याची माहीती यावेळी दिलीप पाटील यांनी अध्यक्षीय भाषणातुन दिली न्यु.इंग्लिश स्कुलच्या मुलांनी समाजगीत म्हटले नवघरे सरांनी संगीत साथ दिली कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.सी.बी.निगळे यांनी केले न्यु.इंग्लिश स्कुलचे मुख्याध्यापक डी.व्ही.गोटे यांनी आभार मानले  यावेळी  विष्णू निकम,नंदलाल वर्मा, अनंतराज आहेर, माणिकराव कवडे, दिलीप पाटील,संदिप आहेर,प्रभाकर काकळीज,दिलीप काकळीज,दत्तराज छाजेड,ए.सी.बोरसे,सांवत, तात्यासाहेब बोरसे, अँड.सचिन साळवे,रोहीदास आहेर,तुषार पांडे, पत्रकार संघाचे अध्यक्ष मारूती जगधने,सुरेश शेळके, व्ही.वाय.काकळीज,महेंद्र जाधव,महाविद्यालयीन प्राध्यापक,न्यु.इंग्लिश स्कुल,अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य एम.बी.पेखळे व शिक्षक,औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य एस.एच.बोरस्ते व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदि यावेळी उपस्थित होते  

फोटो ओळी:- नांदगाव महाविद्यालयात मविप्र संस्थेच्या समाजदिन कार्यक्रम प्रसंगी आद्यसंस्थापक कर्मवीरांची माहीती देतांना प्रा.जावेद शेख,व्यासपीठावर पंचायत समिती सभापती विद्याताई पाटील,जि.प.सदस्य रमेश बोरसे,संचालक दिलीप पाटील, प्राचार्य डॉ.एस.आय.पटेल.

Comments

  1. धन्यवाद, छान बातमी दिल्याबद्दल संपादक साहेबजी,

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ