सा.क्रांतिवीर..विद्यार्थ्यांचे कुस्ती स्पर्धेत यश

शुभ वार्ता-जिल्हा स्तरावर झाली निवड

नांदगाव---संतोष कांदे

      शहरातील व्ही.जे.हायस्कूल मध्ये घेण्यात आलेल्या तालुका स्तरीय ५३,७६,८६ किलो गटातल्या कुस्ती स्पर्धेत मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या कला,वाणिज्य  व विज्ञान महाविद्यालयातील बारावी च्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केल्याने त्यांची जिल्हास्तरावरील कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
        या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये शुभम पाटील,जनार्दन खरात,राहुल चव्हाण यांचा समावेश आहे.या विद्यार्थ्यांचे व्ही.जे.हायस्कूलचे मुख्याध्यापक नरेंद्र  ठाकरे,क्रिडा शिक्षक संदिप आहेर,जाधव,संजय त्रिभुवन महाविद्यालयाचे  प्राचार्य  डॉ.एस.आय.पटेल,कनिष्ठ  महाविद्यालयाचे  प्रमुख प्रा.आर.टी.देवरे,प्रा.एस.एम.नारायणे  प्रा.आर.अल.दिवटे यांनी  अभिनंदन  केले.
   या विद्यार्थ्यांना क्रिडा  शिक्षक प्रा.सी.डी.काटे,प्रा.दिनेश उकिर्डे यांनी बहुमोल मार्गदर्शन  केले.

फोटो  ओळी :- नांदगाव  महाविद्यालयाचे तालुका स्तरीय कुस्ती स्पर्धेत यशस्वी  विद्यार्थ्यांचे  अभिनंदन  करतांना प्रा.आर.टी.देवरे  प्राचार्य  डॉ.एस.आय.पटेल,प्रा.एस.एम.नारायणे,प्रा.सी.डी.काटे,स्पर्धेक विद्यार्थी 

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ