सा.क्रांतिवीर..नस्तनपूर संस्थान चा विधायक उपक्रम

पाणीटंचाईने त्रस्त झालेल्या न्यायडोंगरी करांना दिलासा देण्याचा प्रयत्न

नांदगाव-----संतोष कांदे

अवघ्या तालुक्यावर पावसाअभावी दुष्काळाचे वादळ घोंगावू लागल्याचे विदीर्ण चित्र दिसून येत आहे.शेतीसाठीचे पाणी हा मुद्दा गौण ठरून पिण्याचे पाणी यावरच आता सर्वांनी लक्ष केंद्रीत केले आहे.आणि ही सामूहिक जबाबदारी असल्याचे भान ठेवत नस्तनपूर श्री.शनी संस्थानचे जनरल सेक्रेटरी तथा माजी आमदार अड.अनिल आहेर यांनी संस्थान कडे उपलब्ध पाण्यातून स्वखर्चाने टँकर ची व्यवस्था करत न्यायडोंगरीची पाणीटंचाई निवारणार्थ खारीचा वाटा उचलला आहे.
      याबाबत अधिक असे की,पाणी उपलब्ध असल्याच्या काळात त्या पाण्याचे योग्यरीत्या नियोजन न केल्याने न्यायडोंगरी गावाला प्रथमच भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.तीन ते चार जलसाठ्यात गावासाठी पाण्याचे आरक्षण करून ठेवण्यात आले होते,मात्र पाऊस पडेल या भरवश्यावर शेतीसाठी उपसा होत असलेले पाणी थांबवण्याचे प्रयत्न केले गेले नाही.परिणामी कालांतराने हे पाणी पूर्णतः उपसा झाले,आणि पाऊस ही पडला नाही.
      गावासह, वाड्या, वस्त्या पिण्याच्या पाण्यासाठी कासावीस झाल्या आहेत.अशा परिस्थितीत नस्तनपूर संस्थानच्या विहिरीला पुरेसे पाणी आहे,त्यामुळे या विहिरीतून गावातील सार्वजनिक विहिरीत पाणी टाकून या ग्रामस्थांची तहान भागवण्याचे काम अड.आहेर यांनी संस्थानच्या खर्चातून सुरू केले आहे.
      संकट आले की,देव सुचतो ही उक्ती खरी असली तरी संकट आले की,देव ही मदत करतो.ही गोष्ट ही या उपक्रमातून सिद्ध झाली आहे.

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ