सा.क्रांतीवीर..पुढचा आमदार शिवसेनेचाच.!-:आदित्य ठाकरे

नांदगाव मध्ये प्रथमच आलेल्या युवासेना प्रमुख आदित्य यांनी राजकीय भाष्य टाळले.

नांदगाव---संतोष कांदे

राज्यातील महिला सुरक्षित नाहीत,यासाठी स्वरक्षणाचे वर्ग घ्यावे लागत आहेत,आणि ही वेळ का आली.? हा विचार आता करावा लागेल.! असा अप्रत्यक्ष टोला गृहमंत्रीपद सांभाळणाऱ्या मुख्यमंत्र्यांना मारत, युवसेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी तालुक्यात पुढचा आमदार शिवसेनेचाच होईल,असा ठाम विश्वास ही व्यक्त केला.
     ते नांदगाव शहरातील गुप्ता लॉन्स येथे आयोजित सर्व रोग निदान शिबीर व महिला स्वरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम उदघाटन प्रसंगी बोलत होते.यावेळी व्यासपीठावर ग्रामविकास राज्यमंत्री ना.दादा भुसे,विधान परिषद आमदार नरेंद्र दराडे,जिल्हा परिषद अध्यक्ष सौ.शीतल सांगळे,माजी आमदार राजेंद्र देशमुख,उदय सांगळे,जिल्हाप्रमुख सुहास कांदे,अल्ताफबाबा खान,मनमाड नगराध्यक्ष पद्मावती धात्रक,जेष्ठ नेते बापूसाहेब कवडे,नांदगाव नगराध्यक्ष राजेश कवडे,पंचायत समिती सभापती सौ.विद्या पाटील,बाजार समिती सभापती तेज कवडे,मनमाड सभापती डॉ.संजय सांगळे,विष्णू निकम,मजूर फेडरेशन संचालक प्रमोद भाबड,माजी सभापती विलास आहेर,तालुका प्रमुख किरण देवरे,मनमाड शहर प्रमुख मयूर बोरसे,नांदगाव शहर प्रमुख सुनील जाधव,माजी तालुका प्रमुख राजाभाऊ जगताप,आदींसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
      युवा सेनाप्रमुख ठाकरे पुढे म्हणाले की,आज एका समाज हित असलेल्या कामाच्या उदघाटन प्रसंगी आलो असल्याने अधिक राजकीय भाष्य करणे उचित ठरणार नाही,मात्र भविष्यात आपल्याला सुरक्षित जीवन व सुरळीत सेवा देण्याचा शिवसेनेचा प्रयत्न राहील,यासाठी आपला आशीर्वाद घेण्यासाठी आज मी आलो आहे.असे ते शेवटी म्हणाले.
      जिल्हाप्रमुख सुहास कांदे यांनी आमदार पंकज भुजबळ गेल्या पाच वर्षांपासून जनतेचे प्रश्न सोडवण्यात कसे अपयशी ठरले आहेत,याचा पाढाच वाचला.व शिवसेनेवर विश्वास ठेवा.! पदरी निराशा पडणार नाही,असे भावनिक आवाहन शेवटी केले.

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ