सा.क्रांतिवीर...युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या स्वागतासाठी नांदगाव तालुका शिवसेनेकडून भरगच्च कार्यक्रम

नांदगाव----संतोष कांदे

येत्या शुक्रवारी (दि.२४) नांदगाव तालुका दौऱ्यावर येत असलेल्या युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या स्वागतासाठी शिवसेनेने जय्यत तयारी केली आहे.या करीता जिल्हाप्रमुख सुहास कांदे यांच्यासह झाडून सर्व पदाधिकारी कामाला लागले असल्याचे दिसून येत आहे.
      या कार्यक्रमाचे नियोजन करण्याकामी मनमाड शहर शिवसेनेची बैठक जिल्हा प्रमुख सुहास अण्णा कांदे यांच्या अध्यक्षतेखाली काल संपन्न झाली.यावेळी माजी आमदार राजेंद्र देशमुख,माजी जिल्हाप्रमुख अल्ताफ बाबा खान,रऊफ मिर्झा (सरदार), रमेश हिरण,गोविंद रसाळ उपस्थित होते.
    युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे तालुका भेटीत शिवसैनिकांना आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन करणार आहेत.तसेच
नांदगाव शहरात जिल्ह्यातील नामवंत तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत आरोग्य शिबीर व युवती व स्त्रियांसाठी "स्वरक्षण प्रशिक्षण शिबीर " (सेल्फ डिफेन्स ट्रेनिंग) आयोजित करण्यात आले आहे.
      याप्रसंगी शहर प्रमुख मयूर बोरसे यांनी प्रास्ताविक करतांना या दौऱ्याचा हेतू व सर्व शिवसेनेच्या व युवासेनेच्या पदाधिकारी व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने नांदगाव येतील कार्यक्रमाला उपस्थित राहण्या विषयाचे नियोजन सांगितले.
       यावेळी गटनेते गणेश धात्रक, जिल्हा संघटक राजाभाऊ भाबड,माजी नगराध्यक्ष साईनाथ गिडगे यांनीही मार्गदर्शन केले. बैठकीचे सूत्रसंचालन शिवसेना शहर उपप्रमुख जाफर मिर्झा यांनी केले.
       बैठकीस जिल्हा समनव्यक सुनीलभाऊ पाटील, वि संघटक संतोष जगताप, ता संघटक संजय कटारिया, तालुका उपप्रमुख गोटू केकाण, ज्येष्ट शिवसैनिक राजाभाऊ आहेर, हरीश आसर, नगरसेवक कैलास गवळी,विनय आहेर, लियाकत शेख,दिलीप तेजवाणी, अँड सुधाकर मोरे, रवी खोटरे, गालिब शेख, शहर उपप्रमुख प्रवीण धाकराव, परेश राऊत, खालिद शेख, वाल्मिक आंधळे, मुकुंद झालटे, कृष्णा जगताप, अतुल साबळे, दिनेश घुगे, पंडित सानप, रमेश दरगुडे,
युवासेना शहर अधिकारी इरफान मोमीन, अंकुश गवळी, शहर सचिव देवेंद्र गवांदे, ज्ञानेश्वर नागपुरे, शहर संघटक बाळासाहेब माळवतकर, निलेश ताठे, महेंद्र गरुड, मिलिंद पाथरकर, बब्बू पटेल, युवासेना शहर सरचिटणीस स्वराज देशमुख, ग्राहक संरक्षण कक्ष शहर उपप्रमुख कयाम सय्यद, सचिन आव्हाड, सुभाष माळवतकर, कैलास खैरनार,सचिन दरगुडे, आनंद दरगुडे, अभय निकम, गोकुळ परदेशी, दिपक कवडे, हरीश पगार, संदीप निकम, वाल्मिक शिंत्रे, मंगेश खैरनार, विजय जगताप, राजेंद्र सांगळे, वाल्मिक साळुंके, धिरज हिरे, सुरज झालटे, अमजद शेख, प्रवीण सूर्यवंशी, सुनील कुणगर, साहेब कुरेशी, आशिष मोरे, अमोल मगर, संदीप व्यावहारे, रियाज शेख इत्यादी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ