ऑनलाइन.....सा.क्रांतिवीर..गतिमंद विद्यालयाला सर्वोत्तपरी सहकार्य करू-तहसीलदार आवळकंठे

विद्यालय नामफलक उदघाटन प्रसंगी आश्वासन

नांदगाव---संतोष कांदे

या विद्यालयाचे सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण करा,विद्यालयाला पुढच्या महिन्यापासून धान्य पुरवठा करू.! असे आश्वासन तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांनी दिले.
       तालुक्यातील नांदगाव-औरंगाबाद मार्गावरील गंगाधरी शिवारात असलेल्या या ज्ञानरंजन शिक्षण प्रसारक मंडळ औरंगाबाद या गतिमंद विद्यालयाचा नामफलक उदघाटन सोहळा शिवसंस्कार बहुउद्देशीय संस्थेने आयोजित केला होता,या नामफलकाचे उदघाटन केल्यानंतर तहसीलदार आवळकंठे बोलत होते.
      यावेळी विद्यालयाचे प्राचार्य संजय पाटील यांनी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार केला.याप्रसंगी  शिवसंस्कार संस्थेचे अध्यक्ष सुमित गुप्ता, संजय मोकळ, विशाल वडघूले, वामन पोतदार, श्रावण आढाव, गोपीचंद्र दादा, शांताराम पाटील, पांडुरंग जगताप, ज्ञानेश्वर पाटिल, लकिंचद्र बागुल व अन्य मान्यवर उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ