सा.क्रांतिवीर..तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात

नांदगाव---संतोष कांदे

तालुका क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने तालुकास्तरीय १४,१७,व १९ वर्षाखालील शालेय कुस्ती स्पर्धा व्ही.जे.हायस्कूल येथे संपन्न झाल्या.
        स्पर्धेचे उद्घाटन शाळेचे माजी खेळाडू भालूरचे सरपंच संदीप आहेर यांच्या हस्ते करण्यात आले,तर प्रमुख पाहुणे म्हणून शेतकरी टाईम्सचे संपादक राजेंद्र तळेकर,मुख्याध्यापक नरेंद्र ठाकरे हे उपस्थित होते.मान्यवरांच्या हस्ते हनुमंतरायाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
       तालुक्यातील जास्तीत जास्त खेळाडू राज्य राष्ट्रीय पातळीवर खेळावे अशी अपेक्षा संदीप आहेर यांनी व्यक्त केली मुख्याध्यापक ठाकरे यांनी आपल्या मनोगतात उपस्थित खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.स्पर्धा मॅटवर खेळविल्या गेल्या यावर्षी मुलींचाही सहभाग नोंदविला गेला.
        साधारण २५ शाळांच्या ११६ खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला प्रथम क्रमांक पटकाविलेले खेळाडू नाशिक येथे होणाऱ्या जिल्हस्तरीय स्पर्धेत नांदगांव तालुक्याचं प्रतिनिधित्व करणार आहे त्यामुळे विजयी खेळाडूंना पुढील प्रवेशपत्र देऊन शुभेच्छा देण्यात आल्या याप्रसंगी सुधाकर कातकडे, एस.एन.सूर्यवंशी,डफाल,बी.एम.आहेर,झालटे,आर.एस.रत्नपारखी यांच्यासह तालुक्यातील सर्व क्रीडाशिक्षक,विद्यार्थी,खेळाडू,कुस्तीप्रेमी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती देवरे यांनी केले तर प्रास्ताविक क्रीडाशिक्षक वाल्मिक जाधव आणि आभार जे.एस.पगार यांनी मानले पंच म्हणून वाय. के.जाधव यांनी काम पाहिले.

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ