सा. क्रांतिवीर....आमदार भुजबळांचे मल्हारवाडी ग्रामस्थांकडून आभार.!
राष्ट्रीय पेयजल योजनेत गावाचा समावेश केल्याबद्दल केली कृतज्ञता व्यक्त.
नांदगाव-----संतोष कांदे
सन २०१८-१९ च्या राष्ट्रीय पेयजल योजना कृती आराखड्यात नांदगाव तालुक्यातील मल्हारवाडी सह १६ गावांचा समावेश करण्यात आमदार पंकज भुजबळ यांनी महत्वाची भूमिका बजावल्याने येथील राष्ट्रवादीचे दिपक खैरनार यांनी ग्रामस्थांच्या वतीने आभार मानले आहेत.
माणिकपुंज मध्यम प्रकल्पातून सुमारे एक कोटी रुपये खर्चून साकार होणार असलेल्या या नळ पाणीपुरवठा योजनेत आझादनगर,मोरझर,सोयगाव,गणेशनगर,फुलेनगर, क्रांतीनगर,भौरी,टाकळी बुद्रुक,टाकळी खुर्द,वडाळी बुद्रुक,वडाळी खुर्द,बाणगांव खुर्द,पोही,तांदुळवाडी,खिर्डी,दहेगाव या गावांचाही समावेश आहे.
Comments
Post a Comment