सा.क्रांतिवीर...जळगाव बुद्रुक हरिनाम सप्ताह समारोप
नांदगाव---वार्ताहर
आमच्यावर कितीही टिका करा.! आम्ही घेतला वसा टाकणार नाही,कारण निंदा केल्याने आमच्याकडे पुण्यसंचय होत असतो,म्हणूनच 'निंदकाचे घर असावे शेजारी.! असे म्हटले जात असावे,असे प्रतिपादन महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार तथा वारकरी संप्रदाय नांदगाव तालुका अध्यक्ष बाळकृष्ण महाराज बुरकुल यांनी जळगाव बुद्रुक येथे केले.
गेल्या सात दिवसापासून सुरू असलेल्या हरिनाम सप्ताहाच्या समारोप प्रसंगी काल्याचे किर्तन ते सादर करत होते.हभप बुरकुल महाराज पुढे म्हणाले की,धर्मरक्षणासाठी लोक स्वतः काही करत नाहीत,मात्र जे करतात त्यांच्यावर टिका मात्र मन लावून करतात.आम्ही मात्र ह्या टिकेकडे दुर्लक्ष करून आमचे कार्य सुरूच ठेवणार असल्याचा पुनरुच्चार केला.
पाऊस पडावा,म्हणून गेल्या सात दिवसापासून कांदे,गिते,सांगळे,घुगे,बागुल,अहिरे,आव्हाड,आदींसह अनेक कुटुंबांना २४ तास श्रीराम मंदिरात पहारा द्यावा लागला होता.तर महाप्रसादाचे आयोजन रावसाहेब घुगे,श्रावण कांदे, मधुकर सानप यांचे तर्फे करण्यात आले होते.
दरम्यान या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले शिवसेनेचे तालुका प्रमुख किरण देवरे यांचा सत्कार शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळासाहेब कांदे यांनी केला.
Comments
Post a Comment