सा.क्रांतिवीर...राष्ट्रवादी काँग्रेसची पक्ष वाढीसाठी कासारी ला बैठक
नांदगाव--प्रतिनिधी
नांदगांव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून तालुक्यातील प्रत्येक गावात जावून गावातील जेष्ठ कार्यकर्त्यांची भेट घेऊन व त्यांच्याशी चर्चा करून पुढील काळात पक्ष बांधणी करण्याचा निर्धार नांदगांव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केला असून त्याचाच भाग म्हणून १८ ऑगस्ट रोजी कासारी येथे नानाभाऊ पवार यांच्या निवास स्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक पार पडली.
या बैठकीत गावपातळीवर कार्यकारणी निवडण्या संदर्भात व इतर प्रश्नांबाबत चर्चा झाली. गाव तेथे राष्ट्रवादी काँग्रेस ची शाखा करण्याच्या दृष्टिकोनातून सदर दौरा संपूर्ण तालुक्यात होणार आहे. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष संतोष गुप्ता यांनी दिली.
सदर बैठकीस नांदगांव तालुका कार्याध्यक्ष रमेश पगार, नांदगांव शहर उपाध्यक्ष सतिष अहिरे, अरुण इप्पर (सरपंच), यादव सुक्राम मोरे, धर्मा सावंत, देविदास माळी, अनिल शंकर, तुळशीराम सावंत, रघुनाथ माळी, अमरसिंग राठोड, रमेश राठोड, पांडुरंग काळे, राजू बारवकर, देविदास चव्हाण, महादु पवार, ज्ञानेश्वर पवार, त्र्यंबक चव्हाण, शिवाजी सोनवणे, विकास राठोड, नितीन पवार, लक्ष्मण सोनवणे, डोंगर सोनवणे, पंडित राठोड, वाडीलाल चव्हाण, दगू भाबड, सतीष राठोड, आकाश घुगे, प्रकाश बारसे, शिवलिंग बारसे, भिकन बारसे, आदींसह मोठ्यासंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment