सा.क्रांतिवीर...दत्तवाडी वस्तीशाळेवर ध्वजारोहन उत्साहात
नांदगाव----संतोष कांदे
नांदगाव तालुक्यातील जळगाव बुद्रुक परिसरातील दत्तवाडी या आदर्श वस्तीशाळेत स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
शाळेचे ध्वजारोहन शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्या दगुबाई गिते यांनी केले,तर यावेळी माजी चेयरमन रामदास गिते,अध्यक्ष संजय गिते,भाऊसाहेब दिघोळे, नितीन बोरसे,पंढरीनाथ गिते,नवनाथ वाघ,जितेंद्र वाघ,गजानन घुगे,शिवराम मेंगाळ, हनुमान गिते,गणेश दिघोळे, काळू गिते,यमाजी गिते,वाळूबा गिते,अशोक गिते,गणेश घुगे,कैलास गिते,उत्तम मेंगाळ, सतीश दिघोळे, विलास आव्हाड,गणेश गिते,आदींसह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.
तसेच यावेळी महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार बाळकृष्ण महाराज बुरकुल यांची विशेष उपस्थिती होती.व या शाळेचा प्रथम विद्यार्थी गणेश घुगे याने आपले मनोगत व्यक्त केले.
उपस्थित ग्रामस्थांनी शाळेच्या इमारतीच्या रंगकामासाठी मदत जाहीर केली.
सुत्रसंचालन अमोल बच्छाव यांनी, तर आभार प्रदर्शन नवनाथ गिते यांनी केले.
Comments
Post a Comment