सा.क्रांतिवीर....पक्ष वाढीसाठी राष्ट्रवादी गावागावात जाणार-तालुकाध्यक्ष संतोष गुप्ता
नांदगाव तालुक्यातील परधाडी येथे पहिली बैठक संपन्न
नांदगाव-----संतोष कांदे
तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून तालुक्यातील प्रत्येक गावात जावून गावातील जेष्ठ कार्यकर्त्यांची भेट घेऊन व त्यांच्याशी चर्चा करून पुढील काळात पक्ष बांधणी करण्याचा निर्धार नांदगांव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केला असल्याचे प्रतिपादन तालुकाध्यक्ष संतोष गुप्ता यांनी केले.
ते परधाडी येथील जेष्ठ नेते रामदास पवार यांच्या निवासस्थानी आयोजित बैठकीत बोलत होते.यावेळी रामदास पवार,कांतीलाल छाजेड,शहर उपाध्यक्ष सतीश अहिरे,प्रवीण गायकवाड,नंदकुमार पवार,राहुल गायकवाड,पवन गायकवाड,आदी उपस्थित होते.
गुप्ता पुढे म्हणाले की,गाव तेथे राष्ट्रवादी काँग्रेस ची शाखा करण्याच्या दृष्टिकोनातून सदर दौरा संपूर्ण तालुक्यात होणार आहे.याप्रसंगी या बैठकीस दिलीप निकम , अनिल पवार, रावसाहेब एरंडे, प्रमोद पवार, राकेश गायकवाड, किशोर गायकवाड, भूषण गायकवाड, पुंडलिक पवार, शिवाजी पवार, प्रसाद पवार, सागर गायकवाड, रविंद्र गायकवाड, अरुण पवार, दिलीप पवार, प्रकाश पवार, विजय गायकवाड, विकास गायकवाड, अशोक हजारे, रविंद्र सोमासे, बापू पवार, भूषण निकम, गोकुळ हजारे, तुषार पाटील, शुभम पवार, आदींसह मोठ्यासंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment