सा.क्रांतिवीर..नांदगाव तालुक्यातील ढेकू येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात.!
सरपंच सौ.ज्योती भाऊसाहेब सूर्यवंशी यांचे हस्ते ध्वजारोहण.
नांदगाव---संतोष कांदे
नांदगाव तालुक्यातील ढेकू येथे ७२ वा.स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण सरपंच ज्योती सूर्यवंशी यांचे हस्ते करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे माजी जिल्हा परिषद सदस्य राजाभाऊ पवार यांचे हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.
जिल्हा परिषद शाळा ढेकू येथे माजी सैनिक बाळूबाबा यादव यांच्या हस्ते धोज्यारोहण करण्यात आले.
माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पवार यांनी २० नग बाके, शरद पवार (जातेगाव) १० व संदीप सूर्यवंशी यांनी १० नग बाके येथील जिल्हा परिषदच्या खुर्द व बुद्रुक शाळेला भेट दिले.या नियोजनासाठी गुलाब चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले.
माजी सैनिक बाळूबाबा यादव यांनी सेवानिवृत्त झाल्याबद्दल ७०० वह्या व शाळेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा भेट दिला.तसेच उपस्थितांसाठी अल्पोपहार दिला.या कार्यक्रमाचे नियोजन संदीप सूर्यवंशी यांनी केले.
यावेळी सदस्य नारायण सूर्यवंशी, वाल्मिक शिंदे, भामाबाई गायके, चतुराबाई सूर्यवंशी, सरलाबाई सूर्यवंशी, ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन भाऊसाहेब सूर्यवंशी यांनी केले.
Comments
Post a Comment