सा.क्रांतिवीर..व्ही.जे.हायस्कुल मध्ये मातृ-पितृ पूजन उत्साहात
अभिनव उपक्रम...
नांदगाव----संतोष कांदे
किशोरवयीन मुलांना आई-वडिलांच्या त्यांच्या प्रति असलेल्या कर्त्यव्याची जाणीव करून द्यावी,या कल्पनेला अभिनव पद्धतीने साकार करत शहरातील वैजनाथ जिजाजी विद्यालयात प्रसिद्ध कवी रविंद्र मालुंजकर यांच्या प्रमुख उपस्थितीत माता-पिता वंदन दिन मोठ्या उत्साहात करण्यात आला.
मालुंजकर यांनी आई-वडिलांवर आधारीत संस्कारक्षम कविता व संस्काराचे महत्व विषद केले.
यावेळी शालेय समितीचे अध्यक्ष संजीव धामणे,मुख्याध्यापक नरेंद्र ठाकरे,भैय्यासाहेब चव्हाण यांच्यासह शेकडो विद्यार्थ्यांचे माता-पालक उपस्थित होते.
Comments
Post a Comment