सा.क्रांतिवीर...आपल्या मागण्यांसाठी धनगर समाजाचा ही एल्गार

नांदगाव---संतोष कांदे

     'भीक' नाही  हक्क मागतोय.! येळकोट येळकोट जय मल्हार आदी घोषणा देत,धनगर समाज बांधवांनी ही आरक्षणासाठी मैदानात उडी घेतली आहे.येथील हुतात्मा चौकात रास्ता रोको करत आपल्या विविध मागण्या शासनाचे प्रतिनिधी म्हणून आलेल्या तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांच्या हाती सोपवल्या.सदर मागण्या ३१ ऑगस्टपर्यंत मान्य न केल्यास सकल धनगर समाज आक्रमक होईल असा इशारा यावेळी देण्यात आला.
     या आहेत धनगर समाजाच्या मागण्या
महाराष्ट्रातील धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) आरक्षणाची अंमल बजावणी तत्काळ करावी,धनगर समाजातील विद्यार्थ्यांची थकीत शिष्यवृत्ती तत्काळ वाटप करावी,धनगर समाजातील मेंढपाळांना त्रास देणाऱ्या वनरक्षक अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावे,धनगर समाजातील मेंढपाळांना गायरान जमीन राखीव ठेवण्यात यावी,धनगर समाजातील मेंढपालांना शासकीय मदत देऊन मेंढ्यांसाठी मोफत लसीकरण देऊन मेंढ्यांचा अपघात विमा काढावा.
           सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव द्यावे,शहीद परमेश्वर घोंगडे यांच्या कुटुंबास २५ लाखांची आर्थिक मदत द्यावी,सुशिक्षित बेरोजगार तरुणांना २५ लाखांचे बिनव्याजी कर्ज उद्योगधंद्यासाठी उपलब्ध करून द्यावे,राज्यातील सर्वच विमानतळावरून शेळ्या-मेंढ्यांची निर्यात तत्काळ सुरु करावी,राज्यात धनगड व धनगर एकच आहे अशी दुरुस्ती करावी, जर धनगड असतील तर त्यांचे गाव निहाय नाव व पत्ते जाहीर करावेत, नसतील तर तसे लेखी द्यावे.
         यावेळी धनगर समाजाचे नेते,पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.तर पोलीस निरीक्षक अनिल भवारी व सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.



Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ