सा.क्रांतिवीर..पदवी अभ्यासक्रमाबरोबर विद्यार्थ्यांनी संशोधनावरही भर द्यावा.!-रावसाहेब शेंडगे
नांदगाव----संतोष कांदे
विज्ञानातील पदवी अभ्यासक्रम अभ्यासण्या बरोबरच संशोधनात आवड निर्माण होऊन संशोधनावर भर देण्यात यावा.विद्यार्थ्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानातील करामती व सभोवतालच्या घडामोडी यांची सांगड घालून वैज्ञानिक दृष्टिकोन अवलंबवावा असे प्रतिपादन डॉ रावसाहेब शेंडगे यांनी विज्ञान मंडळ उदघाटन प्रसंगी केले.
येथील मराठा विद्या प्रसारक समाजाच्या कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील या शैक्षणिक वर्षातील विज्ञान मंडळाचे उदघाटन संजीवनी फार्मसी महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ रावसाहेब शेंडगे यांच्या शुभहस्ते करण्यात आले .त्यावेळी ते बोलत होते,ते पुढे म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यामध्ये संशोधन वृत्ती जागृत व्हावी त्याकरिता संशोधन पत्र व रेफेरेन्स बुक अभ्यासावेत. विज्ञानातील पदवी अभ्यासक्रमानंतर विविध उपलब्ध संधी याविषयी त्यांनी सविस्तर माहिती यावेळी दिली.
डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजि व इतर विविध मान्यताप्राप्त संस्था याकडून संशोधन वाढीसाठी देण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती याबद्दल ही त्यांनी माहिती दिली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस आय पटेल यांनी विदयार्थ्यांना संशोधनपर उपयुक्त महत्वपूर्ण माहिती दिली. या कार्यक्रमप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा एस ए मराठे यांनी महाविद्यालयातील विविध उपक्रमांविषयी सविस्तर माहिती दिली.विज्ञान मंडळ प्रमुख प्रा बी एन शेळके यांनी आपल्या प्रास्ताविक मध्ये विज्ञान मंडळाच्या वर्षभरातील विविध उपक्रमांविषयी मार्गदर्शन केले. क्वीझ कंपेटीशन, पोस्टर स्पर्धा, सेमिनार, केमियाड , विज्ञान प्रदर्शन सहित इतर अनेक उपक्रम या वर्षभरात राबविणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.या प्रसंगी व्यासपीठावर विज्ञान विभाग प्रमुख डॉ एम आर गवारे, डॉ पी जे तांबडे,एल डी देढे, डॉ बी डब्लू चवरे, डॉ ए एल तिदार, डॉ प्रतिभा जाधव आदी विज्ञान विभागातील प्राध्यापक उपस्थित होते. विज्ञान मंडळ समिती सदस्य प्रा पी पी जमदाडे,प्रा दिलीप दुधमल, प्रा एस एस शेंडगे यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तृतीय वर्ष विज्ञान वर्गातील विद्यार्थिनी कु अर्शी शेख हिने केले. प्रमुख पाहुण्यांची ओळख कु माधुरी खैरनार तर आभार प्रदर्शन माहेश्वरी जाधव हिने केले. या कार्यक्रम यशस्वीतेसाठी कु आम्रपाली लोखंडे, अनुजा थोरात, प्रणाली हिरे, काजल सरोदे, रोहित काकळीज आदी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. विज्ञान विभागातील सर्व विद्यार्थी , विद्यार्थिनी, प्राध्यापक वृंद व इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते
Comments
Post a Comment