सा. क्रांतिवीर...आमदार साहेब आता तरी आमसभा घ्या.!
शिवसेना माजी तालुका प्रमुख राजाभाऊ जगताप यांची मागणी..
नांदगाव---संतोष कांदे
सद्यस्थितीत नांदगाव तालुका पावसाअभावी होरपळून निघतोय,शेतकरी,मजूर,शहरातील छोटे-मोठे उद्योजक,हातावर पोट असणारे फेरीवाले अशा सर्वच घटकांना दुष्काळाचे चटके जाणवू लागले आहेत,आणि अशा परिस्थितीत विद्यमान आमदारांनी आमसभा घेऊन जनतेला दिलासा द्यावा.! अशी आग्रही मागणी माजी शिवसेना तालुका प्रमुख राजाभाऊ जगताप यांनी केली आहे.
जगताप यांनी पुढे म्हटले आहे की,विद्यमान आमदार पंकज भुजबळ यांना आपण आमदार असल्याचा विसर पडला की काय.? इतपत त्यांचे दर्शन जनतेला दुर्लभ झाले आहे.आजमितीस तालुक्यात पेरण्या पूर्ण होऊन दीड महिन्याचा कालावधी लोटला आहे,अनेक गावांत पाऊस नसल्याने उभ्या पिकांवर नांगर फिरवून शेतकरी आपला संताप व्यक्त करत आहेत.मात्र लोकप्रतिनिधी नात्याने आमदार पंकज भुजबळ,नांदगाव पंचायत समितीच्या सभापती सौ.विद्या पाटील यांनी आमसभा घेऊन शेतकरी,मजूर,व सामान्य जनतेला दिलासा द्यावा.व दुष्काळग्रस्तांसाठी असलेल्या योजना जाहीर करण्यास शासनास भाग पाडावे, अशी मागणी ही माजी तालुका प्रमुख जगताप यांनी केली आहे.
Comments
Post a Comment