सा. क्रांतिवीर...नांदगाव महाविद्यालयास यु.जी.सी.ने सात होकेशनल कोर्सला परवानगी दिली.
प्राचार्य डॉ.पटेल यांची माहिती
नांदगाव----संतोष कांदे
येथील मराठा विद्या प्रसारक समाजाच्या कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या गरीब,मजुर,मागासवर्गीय,तसेच बहुजन समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या पारंपारीक शिक्षणाबरोबरच व्यावसायीक व रोजगार निर्मितीचे शिक्षण देता यावे या साठी महाविद्यालयाने विद्यापीठ अनुदान आयोगाकडे मागणी केलेल्या प्रस्तावास मंजूरी मिळाली आहे.
सात व्यावसायिक होकेशनल कोर्सेस सुरू करण्यासाठी मान्यता मिळालेले नांदगाव महाविद्यालय महाराष्ट्रातील दुसरे विद्यालय ठरले आहे.त्यामध्ये रिनेव्हल एनर्जी (उर्जेचा पुनर्वापर),साँईल अँड वाँटर टेस्टींग (माती व पाणी परिक्षण),बँन्कीग अँड फायनान्स (बँन्केचे कर्ज व्यवहार),फूड प्रोसेस अँड प्रेझेंटेशन (अन्न प्रक्रिया व सादरीकरण)ट्रव्हल अँड टुरिझम (प्रवास व सहल नियोजन)योगा ,मशरुम कल्टीव्हेशन ( आळंबी शेती व्यवसाय) अशा सात कोर्सेसला विद्यापीठ अनुदान आयोगाने मंजूरी दिलेली असुन सदर कोर्सेस महाविद्यालयात लवकरच सुरू होणार आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डाँ.एस.आय.पटेल यांनी दिली.
या कोर्सेसच्या संदर्भात मविप्र संस्थेच्या सरचिटणीस निलीमाताई पवार, मविप्रचे नांदगाव तालुका संचालक दिलीप पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
Comments
Post a Comment