सा. क्रांतिवीर...नांदगावच्या प्रभारी नगराध्यक्षपदी सौ.कामिनी साळवे.!
नांदगाव-----संतोष कांदे
मिळालेल्या पदाचा फायदा नांदगाव शहराच्या विकासासाठी करावा व संधीचे सोने करावे,असे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुहास कांदे यांनी केले,नांदगाव नगरपालिकेच्या प्रभारी नगराध्यक्षपदी सौ.कामिनी सचिन साळवे यांची निवड करण्यात आली,आंबेडकर चौकात पार पडलेल्या पद्ग्रहण सोहळ्यात जिल्हाप्रमुख कांदे बोलत होते.
व्यासपीठावर विद्यमान नगराध्यक्ष राजेश कवडे,नांदगाव पंचायत समितीचे प्रभारी सभापती सुभाष कुटे, नगरसेवक नितीन जाधव, किरण शिंदे, गिरणानगरचे सरपंच शिवाजी कवडे, विजय झोडगे, मनीषा काकळीज, तालुका प्रमुख किरण देवरे, राजाभाऊ जगताप, माजी सभापती विलास आहेर, आनंद कासलीवाल, महावीर पारख, नगरसेवक वाल्मिक टिळेकर , सुनिल तुसे, हरिष भडांगे, आदी उपस्थित होते.
कांदे पुढे बोलताना म्हणाले की,ही संधी अल्प काळासाठी असली तर इच्छाशक्ती असेल तर मोठे काम ही पार पाडले जाऊ शकते.यासह भावी कार्यकाळासाठी शुभेच्छा देत कांदे यांनी कायम सहकार्य केले जाईल,असे आश्वासन यावेळी दिले. याप्रसंगी नगराध्यक्ष राजेश कवडे,प्रभारी सभापती सुभाष कुटे,महावीर पारख,अड.सचिन साळवे,हरीश भडांगे,डॉ.सुनील तुसे,यांनी आपले मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या.
Comments
Post a Comment