सा. क्रांतिवीर...दुबार पेरणीचे संकट टळावे,यासाठी विठ्ठल-रुक्मिणी ला साकडे.!
नांदगाव शहरातील अकरा जोडप्यांच्या हस्ते महाआरती
नांदगाव-----संतोष कांदे
तुटपुंज्या पावसावर पेरणी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांना अस्मानी संकटाचा सामना करावा लागत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.त्यामुळे युवा भुजबळ समर्थकांनी बळीराजा वरचे संकट दूर व्हावे,म्हणून नांदगाव शहरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात महाआरती करून साकडे घातले.
तालुक्यावर गतवर्षीच्या तुलनेत यंदा पावसाने अवकृपा केल्याचे आजपर्यंत चे चित्र आहे.जवळपास सर्वच क्षेत्रातील पेरणी,लागवड पूर्णत्वास गेली आहे.आणि काही गावात तर पिकांनी माना टाकल्याने या पिकांवरून नांगर फिरवण्यात आल्याच्या घटना ही घडल्या.त्याचे महसूल विभागाने तातडीने पंचनामे ही केले.
'संकट आले की,देव सुचतो' या उक्तीप्रमाणे तालुक्यातील आमदार पंकज भुजबळ यांच्या युवा समर्थकांनी शेतकऱ्यांना भावनिक आधार मिळावा,याकरिता विठ्ठल मंदिरात अकरा जोडप्यांच्या हस्ते महाआरती करत पावसासाठी ईश्वराची करुणा भाकली.
यावेळी विनोद शेलार, अशोक पाटील मयुर सोनवणे, सोमेश्वर मोहीते, योगेश सुर्से, सुनिल झेंडे, अॅड. किरण गायकवाड, आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment