सा. क्रांतिवीर..गावाचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी थेट मंत्र्यांच्या गावी.!
नांदगाव----संतोष कांदे
शिवसेना म्हणजे 'राडा'असे समीकरण आहे.कुठलाही प्रश्न असो,तो शिवसेनेच्या दरबारात गेला की,तो तडीस लागतो.अशी ख्याती असलेल्या नांदगाव तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मात्र गांधीवादी विचारसारणीनुसार तालुक्यातील मूळडोंगरी ग्रामपंचायतीचा पाणीप्रश्न मार्गी लावण्यात महत्वाची भूमिका पार पाडली.
एखादा प्रश्न असेल तर साधारणतः तालुका,जिल्हा,राज्य पातळीवरील संबधित मंत्र्यांच्या कार्यालयात जातात,मात्र मुळडोंगरी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.मंगला नावंदर यांचे पुत्र तथा युवा शिवसेना नेते अमोल नावंदर यांनी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना.बबनराव लोणीकर यांची लोणी तालुका परतूर जिल्हा जालना येथे भेट घेत साकडे घातले.त्यावर मंत्री ना.लोणीकर यांनी सकारात्मक आश्वासन दिले.
यावेळी मूळडोंगरी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.नावंदर यांचे सुपुत्र अमोल यांच्यासह उपसरपंच रेणुका मुकणे,सदस्य भिका चव्हाण,समाधान चव्हाण,बडीराम चव्हाण,भगवान मढवई,बबन मोरे,लताबाई मोरे,वाल्मिक मोहिते,अंजनाबाई मोहिते,सर्जेराव मोहिते,सोमा सोनावणे आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment