सा. क्रांतिवीर...शिवसेनेने साधला भौगोलिक व सामाजिक समतोल.!
कवडे-आहेरांच्या रणनितीने जिल्हाप्रमुख सुहास कांदें ची यशस्वी वाटचाल
नांदगाव-----संतोष कांदे
आमदारकी वगळता तालुक्यातील सर्व सत्ता पादाक्रांत केलेल्या शिवसेनेची वाटचाल दमदारपणे सुरू आहे.न्यायडोंगरीची कन्या व काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सावरगाव च्या सुनेला पंचायत समितीचे सभापतीपद देवून,गेल्या ३८ वर्षांपूर्वी आहेर-कवडे यांनी एकत्रितपणे पाटील कुटुंबाला दिलेला शब्द आहेर-कवडे यांच्या प्रमुख साक्षीने सुहास कांदे यांनी पूर्ण केला आहे.
राजकारणात अनपेक्षित घटना पदोपदी घडत असतात.माजी मंत्री तथा येवल्याचे आमदार छगन भुजबळ यांच्या तुरुंगवारीने सैरभैर झालेल्या माळी समाजाला प्रथम सभापतीपद देवून आम्ही (शिवसेना) तुमच्या पाठीशी आहोत,असा संदेश दिला गेला,तर जिल्हा परिषद निवडणुकीत विजयाताई आहेर ह्या पराभूत झाल्या होत्या.त्यामुळे सत्ता (गड) येऊन ही सिंह गेल्याची भावना त्यावेळी व्यक्त होत होती.मात्र सौ.पाटील यांना सभापतीपद दिल्याने पर्यायाने विलास आहेर यांचा एकप्रकारे बहुमान केल्याची भावना आहे.कारण सौ.पाटील ह्या न्यायडोंगरीच्या आहेर कुटुंबातील कन्या आहेत.त्यामुळे जिल्हा परिषद सदस्यपद हुकले असले तरी तालुक्यातील प्रथम क्रमांकाचे पद न्यायडोंगरी गटाला मिळवून आणल्याची भावना गटातील मतदारांमध्ये रुजवण्यास विलास आहेर यांना यश मिळाले आहे.
Comments
Post a Comment