सा. क्रांतिवीर...पिण्याच्या पाण्यासाठी प.स.सभापती असलेल्या न्यायडोंगरी गावाची परवड.!

टँकर सुरू करण्याची माजी आमदार अड.अनिल आहेर व जिल्हा परिषद सदस्य कु.अश्विनी आहेर यांची मागणी

नांदगाव--संतोष कांदे

राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या न्यायडोंगरी गावाचा पाणीप्रश्न यंदा ऐन पावसाळ्यात ऐरणीवर आला आहे,मात्र गटातटाच्या राजकारणामुळे सरपंच लक्ष देण्यास तयार नाही,त्यामुळे माजी आमदार अड.आहेर यांनी राजकारण बाजूला ठेवत पंचायत समितीवर धडक देत आज गावाचा पाणीप्रश्न पोटतिडकीने मांडला.
    जवळपास २० ते २५ हजार लोकसंख्या असलेल्या न्यायडोंगरी गावासाठी दोन ते तीन उदभवातून पाणी पुरवठा होत होता,मात्र पावसाळा सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरी पुरेसा पाऊस न कोसळल्याने गावावर पाणी टंचाईचे भीषण संकट कोसळले आहे.ग्रामस्थांना अक्षरशः ५०० ते ७०० रुपये मोजून खाजगी पाणी टँकर विकत घेऊन आपली गरज भागवावी लागत असल्याचा दुर्दैवी प्रसंग ओढवला आहे.
     पाऊस पडला नाही तर पुढे काय.? असा विचार न केल्याने ग्रामस्थांना पाणी टंचाईचा सामना करावा लागेल,असा यत्किंचितही विचार विद्यमान सरपंचांनी न केल्याने गावावर हा पाणीटंचाईचा दुर्धर प्रसंग ओढवला असल्याचा आरोप माजी आमदार अड.आहेर व जिल्हा परिषद सदस्या अश्विनी आहेर यांनी केला आहे.
    पिंजारवाडी येथील महिलांनी ही पाणी उपलब्ध करावे,म्हणून आज पंचायत समितीवर हंडा मोर्चा काढला होता,त्या महिलांना समर्थन देत अड.आहेर व अश्विनी आहेर यांनी न्यायडोंगरी गावाचा ही पाणी प्रश्न मांडत पाणी टँकर सुरू करण्याची आग्रही मागणी गटविकास अधिकारी जे.टी. सूर्यवंशी यांच्याकडे केली.
   दरम्यान अड.आहेर यांनी तालुक्यातील अनेक गावांतील शेतकऱ्यांचे बोंडअळी नुकसान भरपाई प्राप्त अनुदान मिळत नसल्याची तक्रार तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांच्याकडे केली असता,उद्यापासून पैसे मिळतील असे आश्वासन आवळकंठे यांनी दिले.

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ