सा. क्रांतिवीर....नांदगाव राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश.!
नांदगाव----संतोष कांदे...
शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी जिल्हा प्रमुख सुहास कांदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत,जेष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.त्यामुळे राष्ट्रवादीला निवडणूका जवळ येत असताना हा झटका असल्याचे मानले जात आहे.
शिवसेनेचे मध्यवर्ती कार्यालयात सदर प्रवेश सोहळा संपन्न झाला.यावेळी शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख श्रीमती मंगला भास्कर,महिला आघाडी तालुकाप्रमुख श्रीमती विद्याताई पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नांदगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस महिला शहराध्यक्ष सौ.निलोफर बेग यांच्या समवेत आशा मुक्तार बेग, सुंदर बाबुराव माळी, वैशाली दंडगव्हाळ,काशाबाई वाकोडे, नसरीन मन्यार, रईसा सय्यद, उमा हटकर, लताबाई अहिरे, सविता वाकुडे अशा शेकडो महिला कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला.
सदर कार्यक्रमाप्रसंगी शिवसेना नाशिक जिल्हाप्रमुख सुहास कांदे यांनी 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण या शिवसेना पक्षाच्या धोरणानुसार महिला सक्षमीकरणासह बचत गटाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करून देणार असे आश्वासन दिले. तसेच काही महिला शिवसैनिकांची वेगवेगळ्या पदांवर नियुक्ती देखील करण्यात आली. मिराबाई जाधव-महिला तालुका उपप्रमुख,सोनाबाई गुडेकर- शहर उपसंघटक, सुमनबाई गायकवाड- तालुका उपसंघटक, रानोभाभी मुन्ना शेख- उप शहर संघटक,परविन सुलतान शेख - विभाग प्रमुख,जनाबाई रमेश हिरे- उपविभाग प्रमुख,स्वाती गायकवाड- शहर संघटक , निलोफर बेग - महिला विधानसभा संघटक यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.
यावेळी शिवसेना जिल्हा संघटक राजाभाऊ भाबड, शिवसेना विधानसभा संघटक संतोष जगताप, शिवसेना तालुकाप्रमुख किरण देवरे, शिवसेना तालुका संघटक संजय कटारिया, शिवसेना नांदगाव शहरप्रमुख सुनिल जाधव, वेहेळगाव सरपंच प्रमोद भाबड, युवासेना चिटणीस अय्याज शेख उपस्थित होते.
Comments
Post a Comment