सा. क्रांतिवीर....नस्तनपूर पोलीस चौकीसाठी अद्यावत इमारत.!

श्री.शनी संस्थान ने केली स्वखर्चातून व्यवस्था

नांदगाव---संतोष कांदे

भारतातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या नांदगाव तालुक्यातील नस्तनपूर येथे राज्याच्या पोलीस महासंचालकांनी पोलीस चौकीस मंजुरी दिल्यानंतर श्री.शनी संस्थानने स्वखर्चातून एका अद्यावत पोलीस इमारत उभारली आहे.
       या बाबत अधिक असे की,सन २०१५ च्या फेब्रुवारी महिन्यात या ठिकाणी मोठी चोरी झाल्याने खळबळ उडाली होती,व देवस्थान सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता.म्हणून जनरल सेक्रेटरी तथा माजी आमदार अड.अनिल आहेर यांनी जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन या ठिकाणी पोलीस चौकीची उपयुक्तता पटवून दिली होती.
     त्यानंतर सुमारे अडीच वर्षानंतर विद्यमान पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी याची दखल घेतली,व नांदगाव पोलीस स्टेशनचा स्वतंत्र अहवाल मागवून तसा प्रस्ताव राज्याच्या पोलीस महासंचालक यांना सादर केला.त्यानुसार कार्यवाही करत नस्तनपूर येथे पोलीस चौकी मंजूर करण्यात आली,त्यात एक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक,एक हवालदार,दोन पोलीस शिपाई अशा पदांना मान्यता देण्यात आली.
      या पोलीस चौकीची उभारणी संस्थान ने स्वतः करून द्यावी,असे सुचवण्यात आल्याने संस्थानने या ठिकाणी रेडिमेड स्वरूपाची इमारत उभारली असून,त्यात दूरध्वनी संच,बिनतारी संदेश यंत्र,दुचाकी,लोखंडी कपाट, टेबल,खुर्च्या,लोखंडी रॅक,संगणक संच अशी व्यवस्था करणार असल्याची माहिती संस्थान चे जनरल सेक्रेटरी अड.अनिल आहेर यांनी दिली.
     देवस्थान सुरक्षेसह या पोलीस दलावर २२ गावांच्या सुरक्षेचा भार ही असणार आहे.तर संस्थान चे सेक्रेटरी तथा माजी आमदार अड.अनिल आहेर यांच्या अडीच वर्षांपासून केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले,व देवस्थान सुरक्षेचा प्रश्न ही या निमित्ताने निकाली निघाला आहे.

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ