सा. क्रांतिवीर....नांदगाव महाविद्यालयात वृक्षारोपण.
नांदगाव----संतोष कांदे
निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड व त्यांचे संवर्धन केले तरच भविष्यात चांगले आरोग्य मिळू शकेल,असे प्रतिपादन नांदगाव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.आय.पटेल यांनी केले.
महाविद्यालय आवारात वृक्षारोपण प्रसंगी ते बोलत होते.यावेळी उपप्राचार्य प्रा.एस.ए.मराठे,कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख प्रा.आर.टी.देवरे,राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्रा.आर.टी.आहेर,कनिष्ठ महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्रा.आर.एल.दिवटे,प्रा.एस.एम.नारायणे, प्रा.प्रविण तांबडे,प्रा.सी.बी.निगळे,प्रा.दौंड,प्रा.मापारी,प्रा.गवारी,प्रा.सोनटक्के,प्रा.शांताराम वळवी,प्रा.सुदाम राठोड,प्रा.वाकचौरे,प्रा.एन.एम.गावीत,प्रा.बोरसे,प्रा.दिलीप पाटील,प्रा.आर.डी.पाटील,प्रा.जाधव,प्रा.बच्छाव,प्रा.श्रीमती एस.जी.कांदळकर,प्रा.श्रीमती एस.व्ही.जाधव,प्रा.बी.जे. गावीत,प्रा.एस.आर.कुटे,प्रा.जी.एच.कोळी, प्रा. व्ही.पी.गढरी प्रा.सी.डी.काटे मनोहर देसले, बाहीकर,शुभम आहेर,आदी उपस्थित होते.
या प्रसंगी वरील मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी विविध वनऔषधी झाडे, लिंब,सुबाभूल,अशोक,गुलमोहर,आवळा, पिंपळ,वड,चिंच,चांदणी,शोभेची विविध झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले परिसरात शंभरहुन अधिक झाडांचे वृक्षारोपण केले.
Comments
Post a Comment