सा. क्रांतिवीर..कासलीवाल प्राथमिक विद्यालयात आषाढी एकादशी निमित्त पालखी मिरवणूक

नांदगाव-----संतोष कांदे

येथील क.मा.कासलीवाल प्राथमिक विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त बाल वारकऱ्यांनी दिंडी काढत पूर्वजांचा वारसा सतत सुरू राहील,असा संदेशच यातून दिला.
            विठ्ठल माझा माझा, ये ई ओ विठ्ठला आदी भजनावर पाऊली घेत दिंडीचे आयोजन केले होते.विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांचा पोशाख परिधान करून अवघा परिसर विठूनामाच्या गजराने  दुमदुमून टाकला. शाळेपासून काढण्यात आलेली दिंडी शिवस्फूर्ती चौक, कालिका चौक, पाटील गल्ली मार्गे देवी मंदिर आदी भागातून नेण्यात आली.
        शिवस्फूर्ती चौकात बाल वारकऱ्यांचा रिंगण सोहळा झाला. संस्थेचे चेअरमन सुनीलकुमार कासलीवाल, सेक्रेटरी विजय चोपडा, प्रशासक प्रकाश गुप्ता, सरचिटणीस प्रमिला कासलीवाल, संचालक महेंद्र चांदीवाल यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
         कार्यक्रमाची प्रस्तावना शाळेचे मुख्याध्यापक व्ही. पी. सावंत यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जगताप सर, फणसे सर, पाटील सर, थोरात सर, देवरे मॅडम, पठाण मॅडम, चोळके मॅडम, पवार मॅडम, सुराळकर मॅडम, निकम मॅडम, देशमुख मॅडम, भिलारे मॅडम आदींनी प्रयत्न केले.

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ