सा. क्रांतिवीर....घाटमाथ्यावर दुबार पेरणीची आशंका
जातेगाव---वार्ताहर
नांदगांव तालुक्याच्या पूर्व भागातील घाटमाथ्यावर जातेगाव, बोलठाण,जवळकी, गोंडेगाव, रोहीले,ढेकु खु व बु ||, कुसुमतेल, लोढरे, ठाकरवाडी, वसंतनगर, चंदनपुरी परीसरातील भागात शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे.
सात जुन रोजी सुरुवात होनार्या पावळ्याचे मृग नक्षत्र पुर्णपणे कोरडे गेल्याने शेतकरी बांधवांनी आपआपल्या शेतीची अगोदर मशागत केलेली असल्याने आज ना उद्या पाउस पडेल या आशेवर काही शेतकऱ्यांनी कोरड्यात व काही शेतकरी बांधवांनी किरकोळ पाऊस पडल्यानंतर या भागातील नगदीपीके कपाशी, मका, तुर, मठ, मुग, बाजरी ईत्यादी पिकांची लागवड आणी पेरणीचे कामे उरकून घेतले. परंतु या भागात मोठा पाऊस न झाल्याने जमिनीमध्ये दोन ते तीन ईंच किरकोळ झालेल्या पावसाची ओल गेली होती. जमिनीची तृष्णा पुर्णपणे भागली नसल्याने, आणी असलेली ओल हवेमुळे व ऊण्हामुळे दिवसेंदीवस सुकत असल्याने उगवली पिके पाण्याअभावी करपत असल्याने दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. पावसा आभावी परीसरातील मका व कापुस सारखे प्रमुख पिके नगदी करपण्यास सुरूवात झाल्याने शेतकरीवर्ग हा चिंता ग्रस्तग्रस्त झाला आहे . कृषि विभागाचे मंडलअधिकारी एस. आर.डोखे यांनी दिलेल्या आकडेवारी नुसार घाटमाथ्यावर सहा हजार हेक्टर शेतीचे क्षेत्र असुन आत्ता पर्यंत परीसरातील 98%क्षेत्रात मका 2200 हेक्टर कपाशी 1800 हेक्टर आणी ऊर्वरीत क्षेत्रात ईतर धाण्य कडधान्य लागवडीचे व पेरणीचे क्षेत्र पुर्ण झाली आहे.मागील व वर्षी कपाशीच्या पिकावर बोंडआळीच्या झालेल्या प्रादुर्भावामुळे या वर्षी कपाशीच्या लागवडीचे क्षेत्र कमी झाले आहे. दुबार पेरणी मधुन अपेक्षित उत्पन्नाची आशा मावळल्या जाती. त्यातच कापुस, मका, मुग, तुर, यासारखे नगदी पीके म्हणून ओळखले जाणाऱ्या पिकांचे बाळसे जमिनीच्यावर अंकुर फुटतच मवा आजाराची लागण झाल्याचे दिसून येत आहे. तसेच आधीपासूनच आर्थिक विवंचनेत असलेल्या शेतकऱ्यांनी आहे. ती जमापुंजी सर्व उत्पन्न शेतीसाठी वापरल्याने आता शेतकऱ्यांवर नैसर्गिक संकटा बरोबरच आर्थिक संकटाना तोंड द्यावे लागत असुन खरीप हंगामासाठी अर्थ सहाय्य करणार्या विवीध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीणे चालु वर्षी कर्ज स्वरुपात अर्थ सहाय्य केलेले नसल्याने शेतकरी बांधव सावकारांच्या जाळ्यात ओढले जाण्याची शक्यता आहे.
Comments
Post a Comment