सा. क्रांतिवीर...गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.!

पिंपरखेड च्या ओम साई सांस्कृतिक मंडळाचा उपक्रम

नांदगाव---संतोष कांदे

नांदगाव तालुक्यातील पिंपरखेड येथील ओम साई सांस्कृतिक मंडळ,ममताई बहुउद्देशीय संस्था,बंजारा रॉक स्टार व अहिल्यादेवी मित्रमंडळाच्या वतीने तालुक्यातील विविध विद्यालयातून ज्या-ज्या विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.या विद्यार्थ्यांचे कौतुक एका सत्कार समारंभाद्वारे करण्यात आले.
      यावेळी अध्यक्षस्थानी स्त्रीरोग तज्ञ डॉ.अभिजित पाटील होते,तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ (सुवर्ण पदक विजेते) डॉ.हेमंत सोनवणीस,सरपंच उत्तम सोनावणे,वसंत मवाळ,शिवराम कांदळकर,प्रा. मवाळ,तलाठी श्रीमती भागवत,राजेंद्र मवाळ,दत्तू घोटेकर,जीवन गरुड,पंडित राऊत,सुलतान राठोड,ज्ञानेश्वर तांदळे,संजय कांदळकर,विठोबा मवाळ आदी उपस्थित होते.
      याप्रसंगी हर्षाली निकम,साक्षी गरुड,समाधान सोनावणे,रोहित जाधव,कोमल गरुड,संकेत जाधव,चेतन राठोड,संदीप पवार,(परधाडी),कोमल कदम (जळगाव),शिवकन्या ढगे (बोलठाण),पूजा लगडे, श्रद्धा बाविस्कर,कल्पना घाडगे (नांदगाव),आदिती घोटेकर,ज्ञानेश्वरी घोटेकर,दुर्गेश चव्हाण,आदी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
     कार्यक्रमाचे आयोजन उमेश देशमुख यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ