सा. क्रांतिवीर...नांदगाव पंचायत समितीच्या सभापती पदी सौ.विद्या पाटील.!
सोहळ्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न.?
नांदगाव ---संतोष कांदे
ठरलेल्या आवर्तनानुसार नांदगाव पंचायत समितीच्या सभापतिपदी सौ.विद्या पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा येवल्याचे उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे यांनी सभापती पदाची प्रक्रिया राबवली त्यांना गटविकास अधिकारी जे.टी. सूर्यवंशी यांनी सहकार्य केले.या अर्जावर सूचक म्हणून भाऊसाहेब हिरे यांनी सही केली.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुहास कांदे व जेष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांच्या कुशल नेतृत्वाखाली पंचायत समितीवर भगवा फडकला आहे,व गेल्या १५ महिन्यांपूर्वी प्रथम सभापतीपदावर राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेल्या सौ.सुमन विष्णू निकम यांना संधी देण्यात आली होती.त्यांनी कार्यकाळ संपताच राजीनामा दिला.त्यामुळे या पदावर अपेक्षित सौ.विद्या पाटील यांची निवड करण्यात आली.यावेळी माजी आमदार राजेंद्र देशमुख,नांदगाव बाजार समितीचे सभापती तेज कवडे,पंचायत समितीचे उपसभापती सुभाष कुटे,तालुकाप्रमुख किरण देवरे,जिल्हा मजूर फेडरेशनचे संचालक प्रमोद भाबड,अड.गंगाधर बिडगर,अनंत इनामदार,माजी सभापती विलासराव आहेर,माजी पंचायत समिती सदस्य शशिकांत मोरे,शिवसेना शहर प्रमुख सुनील जाधव,पंचायत समिती सदस्य भाऊसाहेब हिरे,आशा आहेर,जिल्हा परिषद सदस्या मधुबाला खिराडकर,भिकन हेंबाडे, अड.सचिन साळवे,विजय इप्पर,एकनाथ पाटील,एकनाथ सदगीर,पुंजाराम जाधव,अमोल नावंदर,सागर हिरे,अय्याज शेख,मधुकर डोंगरे,मधुकर गिते,आदींसह शेकडो शिवसैनिक,पदाधिकारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment