सा. क्रांतिवीर.....अफवांनी हैवान झाला माणूस.!

नांदगाव----संतोष कांदे

ग्रामीण भागात भंगार,भांडे,कपडे,साड्या,
खाद्य पदार्थ आदीसह असंख्य वस्तू विक्री करून 'पापी पेट' का सवाल सोडवणाऱ्या कुटुंबावर उपासमारीची वेळ या 'सोशल' (बनावट) अफवांनी आणली आहे.
      ज्या दिवसांपासून ह्या अफवांनी जन्म घेतला आहे,त्या दिवसापासून ग्रामीण भागात या फेरीवाल्याचे अस्तित्वच जणू नाहीसे झाल्याचे चित्र आहे.कारण कोणता दिवस कोणत्या गावात कसा उजडेल याची शाश्वती नसल्याने या फेरीवाल्यांनी 'गड्या आपला जीव प्यारा' म्हणत गावात येणे टाळल्याचे दिसून येत आहे.
           मुले पळवणारे समजून धुळे जिल्ह्यात काल पाच जणांना दगड,काठ्यानी अगदी ठेचून ठार मारण्यात आले.आणि मरणानंतर ते निपराधी असल्याचे स्पष्ट झाल्याने 'सोशल मिडीयाचा'...सोशल' शब्द काढून टाकण्याइतपतचे हे कृत्य ह्रदयद्रावक आहे.
        सोलापूर जिल्ह्यातील या भिक्षुकांना जबर मारहाण करत काही या घटनेचे फोटो,व व्हिडिओ चित्रीकरण ही करत असल्याचे दिसून येते.'सोशल' शब्दाचा अर्थ सामाजिक असा होत असला तरी सामाजिक कामात अशा गुन्हेगारी कृत्याचा समावेश नसतो.मुळे पळवून त्यांची किडनी काढली जाते,ही अफवा म्हणजे चवळीचे 'बारा'खांब अशा पद्धतीची आहे.आणि यापूर्वी अशी घटना घडल्याचे एकही उदाहरण गाव,तालुका,जिल्हा,राज्य असे कुठेच ऐकीवात नाही.मग या अफवांना जन्म कसा घातला गेला.? हा संशोधनाचा प्रश्न आहे.
       साधारणतः मकरसंक्रांत या सणाला दरवर्षी एक अफवा पसरवली जात असे,त्याला हे वर्ष अपवाद ठरले आहे.नाहीतर साड्या,बांगड्या,जोडवे, अशा महिलांच्या संदर्भातल्या अफवा पद्धतशीर पसरवल्या जात असल्याचे यापूर्वी घडले आहे.पण त्यात फक्त आर्थिक झळ बसायची,म्हणून गुन्हेगारी कृत्य काही घडत नव्हते.आणि त्या काळी मोबाइल नसल्याने ह्या अफवा गावात येणाऱ्या पाहुण्यांमार्फत घरपोहच व्हायच्या.मात्र काळ बदलला आहे.वाऱ्याच्या वेगापेक्षा जास्त वेग असलेले इंटरनेट उदयास आले आहे.फायदा तर झाला आहेच,मात्र अशा माणुसकी शून्य घटनांमुळे या फायद्याचे महत्व ही घटत चालले आहे.
      ग्रामीण भागात एखादी चोरी किंवा दरोडा पडला तर त्या गावात अशा फेरीवाल्याकडे संशयाने पाहिले जात असे.गावातील एक वर्ग असा असतो की,तो हे कर्तव्य बेमालूमपणे पार पाडत असतो.आणि ही बातमी (अफवा) चौकात,पारावर,स्टँडवर,सायंकाळी किंवा सकाळी प्रसिद्ध केली जात असे.आणि या ठिकाणी येणारा दुसरा वर्ग ही प्रसिद्ध झालेली बातमी (अफवा) पसरवण्याचे कर्तव्य कुठलेही 'मानधन' न घेता इमाने-इतबारे करायचा.कालौघात या दुसऱ्या वर्गाने  बदलत्या काळानुसार आपली जागा 'सोशल मिडियात पक्की केल्याचे काल धुळे जिल्ह्यात घडलेल्या घटनेवरून सिद्ध झाले आहे.
      
* बातमी कशी वाटली.? आपल्या प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत.....

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ