सा. क्रांतिवीर....विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी मनमाड शिवसेनेचे निवेदन.

नांदगाव----संतोष कांदे

सध्या सोशल मिडियामधून मुले पळवली जात असल्याच्या अफवा मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या आहेत,आणि ही गोष्ट खरी नसली तरी पालकांमध्ये काळजीचे वातावरण असल्याचे दिसून येत आहे,म्हणून शहरातील सर्व शाळा व्यवस्थापन समितीची बैठक बोलावून तशा सूचना कराव्यात,अशी मागणी मनमाड शिवसेनेने पोलिसांत केली आहे.
     या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की,सद्यस्थितीत व्हाट्स अप वर मोठ्या प्रमाणात मुले पळवली जात असल्याची पोस्ट व्हायरल झाली आहे,याबाबत एकही सत्य घटना अजून घडलेली नाही,मात्र पालकांमध्ये मात्र काळजीचे सावट असल्याचे दिसून येत आहे.त्यांच्या मनातील भीती काढून शाळा व्यवस्थापन ला मुलांच्या सुरक्षेसंदर्भात कार्यवाही करण्याच्या सूचना पोलिसांनी द्याव्यात,असे या निवेदनात म्हटले आहे.
    एका जनहित याचिकेद्वारे सर्वोच्च न्यायालयाने ही सीसीटीव्ही,तक्रार बॉक्स अशा उपाययोजना करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना केल्या आहेत.असे शेवटी म्हटले आहे.
   या निवेदनावर शहरप्रमुख मयूर बोरसे,माजी नगराध्यक्ष काकासाहेब सोळसे, संतोष जगताप,कैलास गवळी,खालिद शेख,कृष्णा जगताप,निलेश ताठे,महेंद्र गरुड,जाफर मिर्जा,विनय आहेर,अरुण ताठे,सुनील पाटील,किशोर कदम,कुणाल लुनावत,ज्ञानेश्वर बेलदार,सुनील पोहाल,अमीन पटेल,आकाश शिरसाठ,ललित रसाळ आदींच्या नावे व सह्या आहेत.

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ