सा. क्रांतिवीर...अगतिकता की.? समयसूचकता.!

नांदगाव----संतोष कांदे
सामान्य जनता सोडाच ; पण तालुका,जिल्हास्तरीय नेत्यांना ही ज्या साहेबांबरोबर कारणाशिवाय फोटो काढणे शक्य नव्हते,त्या साहेबांबरोबर किशोरवयीन मुले ही मोठ्या उत्साहाने 'सेल्फी' काढत होते,आणि 'साहेब' ही तशी पोज देत असल्याने ही अगतिकता की,साहेबांची समयसूचकता.? असा प्रश्न बरोबर असलेल्या नेत्यांना नक्कीच पडला असेल.?
या बाबत अधिक असे की,राज्याच्या राजकारणात प्रथम स्थानी असलेल्या साहेबांचा दरारा काही औरच होता.पोलीस बंदोबस्त,सफारी कपडे घातलेले सुरक्षा रक्षक,आणि हाय-फाय नेते कम कार्यकर्ते असा लवाजमा यापूर्वी बघितलेल्या लोकांना ते साहेब हेच का.? असा प्रश्न कालच्या घटनेनंतर नक्कीच सतावत असेल.?
नांदगाव तालुक्यातील नस्तनपूर येथील देवस्थानचा कायापालट केलेल्या माजी उपमुख्यमंत्री तथा येवल्याचे आमदार छगन भुजबळ यांनी सहकुटुंब दर्शनासाठी हजेरी लावली,वाहनापसून ते मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यापर्यंत  दुतर्फा उभ्या असलेल्या कार्यकर्त्यांच्या गराड्यातुन ते चालत जात असताना राजकीय पक्षाचे तरुण कार्यकर्ते,किशोरवयीन मुले यांची मोठी फळी गर्दीच्या अग्रस्थानी होती,
साहेबांचा हसरा चेहरा,जोडलेले हात लोकांची आदरयुक्त भीती कमी करण्यास पुरेसा ठरला,मग एकच झुंबड उडाली,साहेबांबरोबर सेल्फी काढण्यासाठी.! आणि साहेबांनीही लोकांची ही आपुलकी बघून तशी पोज देणे सुरू केले.
ज्या तरुणांना साहेब ओळखत ही नाही,त्यांच्या बरोबर सेल्फी काढत असताना बरोबर असलेल्या नेत्यांना ही गोष्ट अप्रूप वाटत होती,कारण त्यांनी साहेबांचा यापूर्वीचा दरारा पाहिला आहे,किंवा अनुभवला आहे.मग त्यामुळेच ते 'साहेब' हेच का.? असा प्रश्न पडत होता.
अडीच वर्षे तुरुंगात काढल्यानंतर झालेला हा बदल कुणाला अगतिकता वाटत असेल,तर कुणाला समयसूचकता.! मात्र खुद्द त्यांच्यासाठी ही भूमिका आगामी राजकारणासाठी लाभदायकच ठरणार,याबाबत दुमत नाही,आणि सेल्फी काढत असताना असलेला त्यांचा व्यवहार ; व त्याच स्वरूपाचे वक्तव्य भाषणातून व्यक्त झाल्याने 'साहेब'खरेच बदलले असल्याची जाणीव उपस्थित नेत्यांना झाली.

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ