सा. क्रांतिवीर...नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील बेपत्ता युवकाचा मृत्यदेह आढळला एका विहिरीत.!

प्रेम संबंधातून हत्या झाल्याचा संशय

सा.क्रांतिवीर

नांदगाव-संतोष कांदे/जातेगाव -अरुण हिंगमिरे

 व्यायाम करायला म्हणून घराबाहेर पडल्यानंतर बेपत्ता झालेल्या ऋतिक त्रिभुवन (वय-१८) याचा दुसऱ्या दिवशी गावातीलच एका विहिरीत मृत्यदेह आढळून आल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.तर ही हत्या की आत्महत्या.? या बाबत विविध मत प्रवाह व्यक्त होत आहेत.                      याबाबत अधिक असे की, येथील ऋतिक राजेंद्र त्रिभुवन वय-१८  हा काल (दि. १४) रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास येथील माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणावर  नेहमीप्रमाणे मित्रांसमवेत व्यायाम करायला गेला होता.व्यायाम आटोपल्यानंतर ऋतिक बोलठाण रस्त्याने एकटाच धावण्यासाठी गेला तो परत आला नाही.तेव्हा त्याच्या सोबत असलेल्या मित्रांनी एक तासभर त्याची वाट पाहुन त्याच्या घरी वरीलप्रमाणे माहिती दिली.ऋतिक चे वडील राजेंद्र भास्कर त्रिभुवन नातेवाईकांनी ऋतिक याचा या परीसरात दहा किलोमीटर अंतरावरील परिसरात सर्व  ठिकाणी शोध घेऊन ही तो मिळून न आल्याने तशी फिर्याद नांदगांव पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली.          रात्री ११.३० ते २ वाजेच्या सुमारास ऋतिक च्या भ्रमणध्वनी वर त्याचे वडील राजेंद्र त्रिभुवन यांनी कॉल केला असता,तो कॉल कट केला जात होता,अशी चर्चा या ठिकाणी होत होती,तसेच तो शिकण्यासाठी बाहेरगावी होता,व ५/६ महिन्यांपूर्वी च गावी परत आला होता.त्यामुळे ही प्रेमसंबंधातून झालेली हत्या तर नव्हे ना.? याची शक्यता पोलीस पडताळून पाहत आहेत.                                                  पोलीस निरीक्षक बशीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलीस   उपनिरीक्षक      बालाजी   पदमने,   हवालदार बोगीर,पोलीस शिपाई  ए.एस. गांगुर्डे, एस. आर. कुमावत, एस. आर. महाले हे पुुुढील तपास करत आहेत.

Comments

Popular posts from this blog

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांची भूमिका महत्त्वाची-: बापूसाहेब कवडे

सा.शनैश्वर टाइम्स...फोटो ऑफ द डे.!

सा.क्रांतिवीर..तयारीला लागा.!-: माजी खा.समीर भुजबळ