सा. क्रांतिवीर...अन त्याने बापाची बरगडी मोडली.!
नांदगाव---संतोष कांदे
चोर आल्याच्या अफवा सोशल मीडियामुळे इतक्या पॉवरफुल झाल्या आहेत की,लोकांची आकलनशक्ती ही काही काळपर्यंत मंद होत राहत असल्याने अनेक अविचारी प्रसंग घडत आहेत.त्यावर हसावे की,रडावे असा प्रश्न निर्माण झाला आहे.
या मजेदार घटनेची माहिती अशी की,नांदगाव तालुक्यातील जळगाव बुद्रुक येथील एका कुटुंबातील तरुण घराबाहेर झोपलेला होता,याची कल्पना त्या तरुणाच्या दिव्यांग आत्याला नव्हती,रात्री बारा वाजण्याच्या सुमारास ती चाचपडत बाहेर गेली,आणि तिचा पाय झोपलेल्या त्या भाच्याला लागला,आणि ती चोर-चोर म्हणून ओरडली,आणि त्या तरुणालाही झोपेच्या धुंदीत आत्या चोरच भासली,अन त्याने एक सणसणीत चपराक आत्याच्या ठेवून दिली.ह्या गदारोळात मग सर्वच जागे झाले.आणि हा खुलासा झाला.यावर तो तरुण चांगलाच खजील झाला.पण गोष्ट येथे संपत नाही...
या वस्तीवर झालेला हा गदारोळ एव्हाना शेजारच्या वस्तीवर पोहचला होता,मग त्या वस्तीवरील एक पिता बैलांना चारा टाकायला म्हणून गेला.पण ते बैल चोरी जाऊ नये,म्हणून त्या व्यक्तीचा मुलगा बैलांजवळ झोपलेला होता,तो सावध झोपलेला असल्याने बैलांकडे अंधारात येत असलेली आकृती पाहून तो आणखीच सावध झाला,हातातील काठी घट्ट मुठीत पकडत त्याने जवळ आलेल्या त्या आकृतीवर जोरदार प्रहार केला,तेव्हा त्या व्यक्तीच्या विव्हळण्याने ते आपले वडील असल्याची जाणीव झाली.पण काठीचा प्रहार इतका जोरदार होता की,त्यांना रुग्णालयात हलवावे लागले,आणि तपासणी केल्यानंतर त्यांची बरगडी टिचल्याचे निदान डॉक्टरांनी केले.तेव्हा त्या तरुणाला कपाळावर हात मारून घ्यावा लागला.
सद्यपरिस्थितीत प्रत्येक घरात स्मार्टफोन अन त्यात व्हाट्स अप आहे.रात्री ११ वाजेनंतर ग्रुपवर आलेले मॅसेज...त्या राहाळात (शेतात) दोन बॅटरी चमकल्या,'डोंगरावरून चार बॅटरी घेतलेले चोर उतरताना दिसले,'अमक्या च्या वस्तीवरून तीन साड्या नसलेल्या चोरांना पिटाळले...अशा स्वरूपाच्या पोस्ट या ग्रामस्थांच्या मनात भीतीचे सावट आपसूकच निर्माण करत असल्याचे दिसून येत आहे.
Comments
Post a Comment