सा.क्रांतिवीर......नांदगाव तालुक्यातील कासारी येथे अंगणवाडी प्रवेशोत्सव-२०१८ साठी तालुका स्तरीय अधिकाऱ्यांची प्रबोधन फेरी
नांदगाव ---संतोष कांदे
जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार नांदगाव तालुका पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी कासारी येथील अंगणवाडीत प्रवेच्छूक विद्यार्थ्यांसाठी प्रभात फेरी काढत ग्रामस्थांचे प्रबोधन केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.नरेश गिते,उपमुख्य अधिकारी दत्तात्रय मुंडे यांच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे गटविकास अधिकारी जे.टी. सूर्यवंशी,बालविकास प्रकल्पाधिकारी संदीप गवळी,गटशिक्षण अधिकारी श्री.पावशे,कासारी च्या सरपंच सुनिता इप्पर,कांतीलाल इप्पर आदींनी कासारी येथील ग्रामस्थ,पालकांचे तीन वर्षे पूर्ण झालेल्या बालकांना अंगणवाडीत, तर ६ वर्ष पूर्ण झालेल्या मुलांना प्राथमिक शाळेत दाखल करण्याविषयी आवाहन केले.
यावेळी अंगणवाडी सेविका मीराबाई राठोड,गंगाबाई पवार,सुनीता राठोड,उज्वला इप्पर आदींसह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment